Maharashtra cabinate minister portfolio: मागील आठवडयात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवशी अजित पवार यांनी हजेरी लावली होती. तसेच नंतर शरद पवार यांनी विविध कामांसाठी पंतप्रधानांचीही भेट घेतली. दरम्यान या भेटीनंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तसेच अजित पवार यांना अर्थमंत्रीपद मिळणार अशी अटकळही बांधण्यात येत होती.
विधिमंडळातील अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर या चर्चेला पुष्टी मिळत असल्याचे जाणकारांचे म्हणणे असून लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ खाते वाटपात अजित पवार यांच्याकडे पुन्हा अर्थमंत्री पद दिले जाऊन शकते, अशा चर्चा कालपासून सुरू झाल्या आहेत.
याचे कारण म्हणजे विविध विभागाच्या 2024-25 या वर्षासाठीच्या पुरवणी मागण्यांना विधानपरिषदेत मंजुरी देण्यात आली. मागील राज्यसरकारमध्ये अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनीच या मागण्यावरील प्रश्नावर उत्तरे दिली. त्यामुळे अर्थखाते पुन्हा अजित पवार यांना मिळणार का? याची चर्चा सध्या राजकीय आणि वर्तुळात जोर धरू लागली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना सांगितले की, संबंधित विभागांच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सभागृहातील सदस्यांनी सहभाग घेतला. या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांच्या माध्यमातून लेखी उत्तरे दिली जातील. सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची शहानिशा करुन त्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, पुरवणी मागणीवरील चर्चेत काही सदस्यांनी महानगरपालिका नगरपालिकांच्या अखत्यारीत असलेले प्रश्न उपस्थित केले. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात येतील. तसेच नागरिकांच्या दृष्टिकोनातून सदस्यांनी उपस्थित केलेले सर्व प्रश्न सोडविले जातील, असेही त्यांनी सांगितले.
पुरवणी मागण्या आणि अर्थविषयक चर्चा यांमुळे अजित पवारांच्या अर्थमंत्रीपदाची चर्चा सुरू आहे.












