Soybean bajarbhav : आज शनिवार दिनांक २१ रोजी अकोला बाजारात तुलनेने पिवळ्या सोयाबीनची सर्वाधिक म्हणजेच ४३३९ क्विंटल आवक झाली. याठिकाणी पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी ३५०० रुपये, जास्तीत जास्त ४५२० रुपये, तर सरासरी ४ हजार रुपयांचा बाजारभाव मिळाला.
मेहकर बाजारात स्थानिक वाणाच्या सोयाबीनची सुमारे पावणे अकराशे क्विंटल आवक झाली. त्यासाठी किमान ३५०० रुपये, तर सरासरी ४२०० रुपये बाजारभाव मिळाला.
हिंगोली बाजारात स्थानिक वाणाच्या सोयाबीची १ हजार क्विंटल आवक झाली. या ठिकाणी किमान ३७०० रुपये तर सरासरी ३९२७ रुपये बाजारभाव मिळाला. उमरेड बाजारात पिवळ्या सोयाबीनला सरासरी ३८५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.
सध्या सोयाबीनचे बाजारभाव खाली आले असून कमीत कमी ३५०० रुपये तर सरासरी ३८०० ते ४ हजार रुपये प्रति क्विंटल असे मिळत आहेत.
दरम्यान काल शुक्रवार दिनांक २० डिसेंबर रोजी लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची सुमारे १९ हजार क्विंटला आवक झाली. कमीत कमी ३८५० रुपये तर सरासरी ४१०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.












