Allotment of bungalows : मंत्रालयात बंगले आणि दालन वाटपाची लगबग; कृषी मंत्र्यांना कुठला बंगला मिळाला.

banglow

Allotment of bungalows :- राज्याच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप शनिवारी जाहीर झाल्यानंतर सोमवारपासून मंत्र्यांना शासकीय निवासस्थाने आणि मंत्रालयातील दालने वाटपाचे काम सुरू होते. अनेकांना दालने न मिळाल्याने अद्याप त्यांनी कार्यभार स्वीकारला नसून लवकरच मंत्री आपल्या खात्याचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे समजते.

दरम्यान अनेक मंत्र्यांना यंदा खातेवाटपात तुलनेने कमी महत्त्व असलेले खाते मिळाले, त्यामुळे ते नाराज असून त्यांची नाराजी मलबार हिलवरील मोठे आणि मोक्याचे बंगले देऊन दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात पंकजा मुंडे यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्थातच मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील दालन मिळाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सहाव्या मजल्यावरील उत्तर बाजूकडील आणि सातव्या मजल्यावरील ७१७, ७२२, ७२३, व पाचव्या मजल्यावरील ५०३ क्रमांकाचे दालन मिळाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सहाव्या मजल्यावरील उत्तर पूर्वेकडील दालन मिळाले आहे. तसेच ७व्या मजल्यावरील ७१७ क्रमांकाचे दालन मिळाले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे महसूलमंत्री असून त्यांना चित्रकुट हे निवासस्थान देण्यात आले आहे. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मलबार हिल वरील अंबर -२७ हे निवासस्थान देण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांना मलबार हिलवरील रामटेक बंगला देण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मलबार हिलवरील शिवगिरी बंगला देण्यात आला आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना मलबार हिलजवळील ज्ञानेश्वरी बंगला देण्यात आला आहे.

Leave a Reply