
kanda bajarbhav: रोज बाजारात येणाऱ्या कांद्याची दैनिक आवक सोमवारपासून घटल्याने कांद्याचे बाजारभाव पुन्हा वाढले आहे. काल सोमवारी काहीसे स्थिरावलेले बाजारभाव काल पन्नास ते १०० रुपयांनी वाढल्याचे दिसून आले. लासलगाव बाजारसमितीत काल दिनांक २५ डिसेंबर रोजी लाल कांद्याला सरासरी २ हजाराचा बाजारभाव मिळाला. दिनांक २४ डिसेंबर रोजी हाच बाजारभाव १९०० रुपये प्रति क्विंटल होता. त्यात थोडी वाढ झालेली दिसून आली.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील बाजारसमितीत आज दिनांक २६ डिसेंबर रोजी कांद्याचे बाजारभाव वाढल्याचे दिसून आले. खेड चाकण बाजारसमितीत आज सकाळच्या सत्रात कांद्याच्या दरात कालच्या तुलनेत १०० रुपयांची वाढ होऊन कांदा सरासरी २३०० रुपये प्रति किलोने विकला गेला.
पुणे बाजारसमितीत कांद्याचे दर कालच्या प्रमाणेच स्थिर राहिले असून सरासरी २४०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लोकल कांद्याला मिळाले. दरम्यान मागील आठवड्यात सोलापूर बाजारात घसरलेले कांदा दर आता पुन्हा बाळसे धरू लागले असून काल दिनांक २५ डिसेंबर रोजी कांदा १८०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिरावला आहे.
दरम्यान आज दिनांक २६ डिसेंबर रोजी सातारा जिल्हयातील वाई बाजारात सकाळच्या सत्रात कांदा जास्तीत जास्त ६ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. याठिकाणी केवळ १२ क्विंटल आवक झाली. त्यातून कांद्याचे किमान दर २ हजार, जास्तीत जास्त ६ हजार, तर सरासरी ४५०० रुपये इतका प्रति क्विंटलसाठी मिळाला.