Manmohan singh : राज्यातील शेतकऱ्यांना ७२ हजार कोटींची कर्जमाफीसह कृषी क्षेत्रातही सुधारणा…

Dr Manmohan Singh भारताचे माजी पंतप्रधान आणि जगविख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे काल २६ डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. देशाची अर्थव्यवस्था संकटात असताना त्यांनी आर्थिक सुधारणा करून देशाला प्रगतीपथावर नेले. तसेच सलग दहा वर्षे पंतप्रधानपद भुषविणारे पं. नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतरचे ते एकमेव पंतप्रधान ठरले.

नव्वदच्या दशकात तत्कालिन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्रीपदी काम करत असताना देश आर्थिक अडचणीतून जात होता. त्याचवेळेस डॉ. मनमोहन सिंग यांनी जागतिकीकरण आणि आर्थिक सुधारणा स्वीकारून देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले आणि प्रगतीपथाकडे नेले. त्यातूनच भारताला जगाची बाजारपेठ खुली झाली, तर अनेक कंपन्या भारतात आल्या. त्यातूनच बीटी सारखे आधुनिक बियाणे भारतात आल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा झाला. याशिवाय अनेक प्रकारची बियाणे, वाणे आणि औजारे व कृषी यंत्रे देशात आली. अनेक फायनान्स कंपन्याही देशात आल्याने कृषी क्षेत्रातील गुंतवणूकही वाढली, तसेच शेतकऱ्यांना कर्ज मिळणे सुलभ झाले. दुसरीकडे कृषी निर्यातीचे जगाचे मार्केटही आपल्यासाठी खुले झाले, यासाठी तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रेय दिले जाते.

सर्वात मोठी कर्जमाफी…
मनमोहनसिंग २००४ मध्ये पंतप्रधान झाले त्या काळात महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर होता. अमरावती जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या घरी तेव्हा मनमोहन सिंग यांनी भेट दिली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्या वेळेस देशाचे कृषी मंत्री शरद पवार होते. त्यांच्या प्रयत्नातून आणि डॉ. सिंग यांच्या संवेदशीतलेतून राज्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरील ७२ हजार कोटीचे कर्ज त्यावेळेस केंद्र सरकारने विशेष पॅकेज देऊन माफ केले. स्वातंत्र्यानंतर इतकी मोठी कर्जमाफी देण्याची ही पहिलीच घटना होती.

Leave a Reply