
Soybean Market : राज्यात सोयाबीनचा भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका, ब्राझील यांसारख्या प्रमुख सोयाबीन उत्पादक देशांत सोयाबीनचे यंदा चांगले उत्पादन झाले आहे.
येत्या काही महिन्यांतही सोयाबीनचा भाव वाढण्याची आशा धूसर असल्याचे व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सोयाबीन भाव दबावात असून,खुल्या बाजारात सोयाबीनचा भाव दिवसेंदिवस घसरत आहे. सोयाबीनच्या भावात गुरुवारीही काहीशी नरमाई आली होती.सरकारची हमीभावाने खरेदी खूपच धिम्या गतीने सुरू आहे.प्रक्रिया प्लांटसकडून मागणी कमी झाल्याने खुल्या बाजारात सोयाबीनचा सरासरी भाव प्रतिक्विंटल ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान आहे. यामुळे खुल्या बाजाराला याचा आधार मिळत नाही.
सरकारने जो दावा करून २० डिसेंबरपर्यंत वायदेबंदी केली, तो दावाच फोल ठरला आहे. प्रत्यक्षात त्यानंतरही बाजारात शेतमालाचे दर पडले आहेत. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि आयात-निर्यातदार यांनी वायदेबंदीची मुदत २० डिसेंबरला संपल्यानंतर सरकारने वायदे सुरू करावेत, अशी मागणी करत आहेत.
सोयाबीनला मागच्या चार वर्षांतील नीचांकी भाव..
* सोयाबीन २०२०-२१ मध्ये ९ हजार २३५ रुपये प्रति क्विंटलला , २०२१-२२ मध्ये ६ हजार ७१९ रुपये प्रति क्विंटल, २०२२ २३ मध्ये ५ हजार १६५५ रुपये प्रति क्विंटल, तर यंदा अर्थात २०२३-२४ मध्ये सोयाबीनला अवघा ४ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा भाव मिळत आहे.
* मागील ५ वर्षांतील सोयाबीनला यंदा मिळणारा भाव हा नीचांकी आहे.
काय म्हणतात व्यापारी…
सोयाबीन उत्पादक देशांत सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन अमेरिका आणि ब्राझील या प्रमुख झाले. तर अर्जेंटिनातही सोयाबीनसाठी पोषक वातावरण आहे. अशात सोयाबीनच्या भाववाढीची शक्यता कमीच आहे. तथापि, भाव यापेक्षा कमी होण्याचीही शक्यता नाही. शासकीय खरेदी मोठ्या प्रमाणात वाढ झाली, तर सोयाबीनला फायदा होऊ शकतो.- आनंद चरखा, अध्यक्ष, व्यापारी युवा मंडळ, वाशिम