
soybean bajarbhav : सध्या बाजारात सोयाबीनची आवक कमी होताना दिसत आहे. मात्र भावही त्या तुलनेत वाढलेले दिसून येत नाही. दिनांक ३० डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात सोयाबीनला सरासरी ४ हजार ९२ रुपयांचा दर मिळाला. मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत दरात कोणतीही वाढ दिसून आली नाही.
दुसरीकडे यंदा हमीभावासाठी सुमारे साडेसहा लाख शेतकऱ्यांनी नोंद केली असून आजतागायत सोयाबीनची विक्रमी म्हणजेच साडेतीन लाख क्विंटल खरेदी नाफेडमार्फत झाली आहे. असे असले तरी त्याचा कुठलाही परिणाम खुल्या बाजारात झालेला नसून सोयाबीन आहेत तसेच आहेत असे दिसतेय.
दरम्यान बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्ष, पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत रु. ४०९२ प्रती क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत ०.२% घट झाली आहे.
सोयाबीनची खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु.४८९२ प्रती क्विटल जाहीर करण्यात आलेली आहे. सध्या लातूर बाजारात सोयाबीनच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत.
मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर २६ टक्केनी घट झाली आहे. मागील आठवड्यात प्रमुख बाजारपैकी वाशीम बाजारात सोयाबीनच्या सरासरी किंमती सर्वाधिक होत्या (रु.४२८०/क्विंटल.) तर अमरावती बाजारात सरासरी किंमती रु.३९८३/क्विंटल होत्या.