
kanda bajarbhav : शनिवारी कांदा बाजारभावात पुन्हा मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. काल शुक्रवारी राज्यात केंद्रीय कृषीमंत्री दौऱ्यावर होते. त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी निर्यात शुल्क काढून टाकण्याची मागणी केली होती. त्यानंतर बाजारभाव वाढणार होते. मात्र याबद्दल माननीय मंत्र्यांनी ठोस आश्वासन दिले नाही.
दुसरीकडे नाफेड आणि एनसीसीएफमध्ये जो कांदा खरेदी घोटाळा झाला आहे, त्यावर मात्र कृषी मंत्र्यांनी भाष्य केले असून नाफेड आणि एनसीसीएफ ऐवजी दुसऱ्या एजन्सीज किंवा संस्था नेमण्याची तयारी केंद्राने चालविली आहे. त्यातून कांदा घोटाळा कमी होऊन शेतकरी, ग्राहक आणि सरकार तिघांचाही फायदा होईल.
दरम्यान आज आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवारी लासलगाव बाजार सकाळी सुरू झाला तेव्हा शेतकऱ्यांना आनंद झाला. कालच्या तुलनेत आज बाजारभावात मोठे बदल झाले. लासलगावच्या विंचूर बाजारात सकाळच्या सत्रात कांदा चक्क ३ हजारावर प्रति क्विंटल पोहोचला, तर कमीत कमी दर १ हजार, आणि सरासरी २५०० रुपये प्रति क्विंटल होते. कालच्या पेक्षा आज येथे भाव वाढलेले दिसले.
शेजारच्या मनमाड बाजारातही कांद्याने भाव खाल्ला आणि कांद्याचे सरासरी दर २२०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले, तर जास्तीत जास्त कांदा बाजारभाव २६०० रुपये होते.
पुण्यात मोशी बाजारात मात्र कांद्याचे सरासरी दर १७५० असे राहिले. कालच्या तुलनेत ते थोडेस वधारले आहेत. तर याच बाजारात जास्तीत जास्त बाजारभाव ३ हजार इतके आहेत.