Hi-tech technology : शेतजमीन मोजणीत हायटेक तंत्रज्ञानाचा वापर….

Hi-tech technology : दिवसेंदिवस शेतजमीन मोजणीत हायटेक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. परिणामी, जिल्ह्यात ५७ रोव्हरद्वारे मोजणीचे काम केले जात आहे. केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेंतर्गत शहराप्रमाणे गावांनाही पत्रिका देण्यात येत आहेत. मोजणीत अचूकता आणि गतिमानता येत आहे. याशिवाय ऑनलाइन अर्ज दाखल करून घेतले जात असल्याने वशिलेबाजी, खाबुगिरीला काही प्रमाणात चाप बसला आहे.

ड्रोनद्वारे सर्वेक्षण
ड्रोन सर्वेक्षणामुळे हद्दीवरूनचे वाद टाळता येणार आहेत.
यात वेळ, पैसाही लागत असे. आता जमिनीचे मोजमाप, सर्वेक्षण ड्रोन सर्वेक्षणच्या माध्यमातून होणार आहे.
प्रत्येक गावातील जमिनीचा डिजिटल नकाशा, कुठल्या शेतकऱ्याची किती एकर जमीन आहे? या तंत्रज्ञानाचा वापर करून करता येणार आहे .
यापूर्वी मनुष्यबळाचा वापर करून जमिनीचे मोजमाप करावे लागायचे.
एखाद्या शेतकऱ्याकडे किती एकर जमीन आहे, ड्रोनद्वारे मॅप तयार केला जाणार आहे.

मोजणीतील मनुष्यबळही उच्चशिक्षित..

भूमी अभिलेखमध्ये सर्वेव्हअर म्हणून बीई शिक्षण घेतलेल्या तरुणांनी नोकरी स्वीकारली आहे.
मोजणीसाठीचे आधुनिक यंत्र रोव्हरसह इतर तंत्रज्ञान सहजपणे आत्मसात करीत आहेत.
संगणक हाताळण्यात ते तज्ज्ञ आहेत. याचाही फायदा प्रशासनास होत आहे.

रोव्हरद्वारे मोजणीमुळे अचूकता..

मोजणीत गतिमानता आल्याने मोजणीची प्रकरणे मार्गी लावणे सोपे झाले आहे.
रोव्हर तंत्रज्ञानामुळे जमीन मोजणीत अचूकता आली आहे. वेळही वाचत आहे.

ऑनलाइन अर्ज..

मोजणीसाठी पूर्वी ऑफलाइन अर्ज दाखल करून घेतले जात होते.
ऑनलाइन अर्जामुळे नियमाप्रमाणे मोजणीचा नंबर येतो.

Leave a Reply