Kanda bajarbhav : सुमारे दोन आठवड्यापूर्वी उतरणीला लागलेले कांदा बाजारभाव नंतरच्या दोन आठवड्यात वाढले आणि आताही या आठवड्यात सोमवारपासून हे बाजारभाव टिकून आहेत.
शनिवारी लासलगाव बाजारात लाल कांद्याचे बाजारभाव सरासरी २५०० रुपये प्रति क्विंटल असे होते. मागील आठवड्यात लासलगाव बाजारातील हे सर्वाधिक सरासरी बाजारभाव होते. नंतर रविवारच्या सुटीनंतर सोमवारी आवक वाढूनही बाजारभाव टिकून राहिले. काल सोमवार दिनांक ६ जानेवारी रोजी कांदा बाजारभाव सरासरी २५०० रुपये होते.
शनिवारी लासलगाव बाजारात १७६१ टन कांदा आवक झाली, तर सोमवारी तिच्यात वाढ होऊन सुमारे २९०० टन इतकी कांदा आवक झाली. मात्र तरीही आवक वाढून भाव कमी न होता टिकून राहिले. कमीत कमी १ हजार आणि जास्तीत जास्त ३ हजार व सरासरी २५०० असे बाजारभाव होते.
दरम्यान मंगळवार दिनांक ७ जानेवारी रोजी कांद्याच्या बाजारभावात अल्पशी घसरण झाली, तरीही बाजारभाव दोन हजारांच्या पुढेच आहेत. पिंपळगाव बसवंत-सायखेडा बाजारात सरासरी २२०० रुपये प्रति क्विंटल पोळ कांद्यासाठी, मनमाड बाजारात २३०० रुपये, राहता बाजारात २२५०, सांगलीत, २ हजार, पुण्यात २३५० रुपये, पिंपळगाव बसवंतला २४०० रुपये, सिन्नरला २२५० रुपये बाजारभाव सरासरी आहेत.












