kanda bajarbhav : मागील सप्ताहात कशी राहिली कांद्याची चाल..

kanda bajarbhav : शेतकरी मित्रांनो नमस्कार, कांदा उत्पादन घेताना आपल्याला नेहमीच कांद्याच्या बाजारभावाची काळची आणि उत्सुकता असते. त्यासाठीच तुम्ही बाजारभाव आणि त्याचे विश्लेषण वाचत असतात. अनेकांना कृषी २४च्या कांदा बाजारभावाच्या आणि विश्लेषणाच्या बातम्यांचीही प्रतीक्षा असते.

म्हणूनच आज आम्ही या आठवड्यात कांदा बाजारभाव विश्लेषण आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. मागच्या आठवड्यात कांदयाचे साप्ताहिक बाजारभाव कसे होते? त्यात काय बदल घडले, आवक कशी राहिले ते जाणून घेऊन. त्यामुळे तुम्हाला पुढच्या बाजारभावांविषयीची माहिती आणि अंदाज समजण्यासही मदत होणशर आहे.

तर मित्रांनो कांद्याची लासलगाव बाजारातील मागील सप्ताहातील सरासरी किंमती रु. २४८६ प्रती क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतींत वाढ झाली आहे.
विरोधाभास म्हणजे देशपातळीवरव राज्यात कांद्याच्या आवकमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत १७ % नी वाढ झाली आहे.

मागील आठवड्यात अहिल्यानगर बाजारात कांद्याच्या किंमती (रु. २७३३ / क़्वि.) सर्वाधिक होत्या, तर सोलापूर बाजारात कांद्याच्या किंमती रु.२०००/क़्वि. इतक्या होत्या. दुसरीकडे कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजारात कांद्याचे बाजारभाव सरासरी २३०० रुपयांवर स्थिर राहिलेले होते.02:49 PM

 
 

Leave a Reply