Soybean Bajarbhav: सोयाबीनच्या किंमतीसाठी कसा होता आठवडा?

Soybean Bajarbhav:  सध्या सोयाबीनच्या किंमती हमीभावापेक्षा कमी आहेत. असे असले तरी दोन आठवड्याच्या तुलनेत मागील आठवड्यात सोयाबीनच्या किंमतीत बदल झालेला दिसून येत आहे.

बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार सोयाबीन साप्ताहिक किंमती दि. ५ जानेवारी २०२५ अखेर : रु. ४१७१ प्रती क्विंटल अशा राहिल्यात.

मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत रु. ४१७१ प्रती क्विंटल होती. त्या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत किंमतीत १.९ % वाढ झाली आहे.

सोयाबीनची खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु.४८९२ प्रती क्विटल जाहीर करण्यात आलेली आहे. सध्या लातूर बाजारात सोयाबीनच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत, असे दिसून आले.

दरम्यान मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर ३ टक्केनी वाढ झाली आहे.

मागील आठवड्यात प्रमुख बाजारपैकी वाशीम बाजारात सोयाबीनच्या सरासरी किंमती सर्वाधिक होत्या (रु.४३७५/क्विंटल.) तर अमरावती बाजारात सरासरी किंमती रु ३०८५/क्विंटल होत्या.

Leave a Reply