Devendra-Fadnavis-UddhavThackeray : देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट : भाजपसोबत जाण्याची तयारी?

Devendra Fadnavis and Uddhav Thackeray meet : उद्धव ठाकरे भाजपच्या गाडीत बसण्याच्या चर्चांमागील कारणे म्हणजे देवेंद्र फडणवीसांबरोबर वाढलेली जवळीकता, अस्तित्व टिकवण्याची धडपड, आणि मुंबई महानगरपालिकेतील सत्ता मिळवण्याची गरज. ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या विचारात असून, भाजपसोबत जुळवून घेण्याचे प्रयत्न चालू आहेत.

एक तर तू राहशील किंवा मी राहीन विधानसभा निवडणुकांच्या आधी उद्धव ठाकरेंनी या शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज दिलं होतं त्यामुळे ठाकरेंच्या मनात फडणवीसांबद्दल असलेला राग हा राजकीय नसून तर वैयक्तिक आहे असं बोललं गेलं
ठाकरेंना सोबत घेणार का असा प्रश्न जेव्हा जेव्हा फडणवीसांना विचारण्यात आला तेव्हा तेव्हा हा निर्णय आता आमच्या वरिष्ठांच्या हातात आहे माझ्या बाजूने आता दरवाजे बंद आहेत असंच फडणवीसांनी सांगितलं
पण ठाकरे फडणवीसांमधली ही राजकीय जुगलबंदी कधीही संपणार नाही अशा चर्चा व्हायच्या आता मात्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि
उद्धव ठाकरे यांचे सूर बदलल्याचं दिसतं. नागपूर अधिवेशनावेळी फडणवीसांशी घेतलेली भेट असेल किंवा मग गडचिरोलीच्या विकासावरनं सामनामधनं फडणवीसांचं केलेलं कौतुक असेल या सगळ्या गोष्टींवरून ठाकरे फडणवीसांशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतात का अशा बातम्या यायला सुरुवात झाली आहे .

देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सामनात न केल्या अभिनंदनाचा स्वीकार केलाय त्यामुळे शिवसेना ठाकरे गट हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपशी जुळवून घेत त्यांच्या सोबत जाणार का याची चर्चा सध्या जोरदार होतीय. विधानसभेत झालेल्या दारूण पराभवानंतर शिवसेना ठाकरे गट पुन्हा जुन्या मित्राला साथ घालत भाजपच्या गाडीत बसणार का आणि असं झालं तर त्याचा नेमका कोणाला कसा फायदा होणार समजून घेऊयात पाहूयात या लेखा मधून.

नमस्कार तुम्ही वाचत आहात कृषि २४ तास (krishi24.com) उद्धव ठाकरे भाजपच्या गाडीत बसतील या चर्चेचं पहिलं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढलेली जवळीकता उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीची वाट धरल्यानंतर गेल्या पाच सहा वर्षात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत या सगळ्या नेत्यांसोबतच ठाकरे गटाच्या सगळ्याच प्रमुख नेत्यांनी फडणवीस आणि मोदी शहांना चांगलंच टार्गेट केलं फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी ठाकरेंनी सोडली नाही फडणवीसांनी सुद्धा ठाकरेंच्या टीकेला जशास तसं उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं

पण विधानसभा निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक 132 जागा जिंकल्या आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले तर महाविकास आघाडीतल्या सगळ्या पक्षांना फक्त 47 जागा जिंकता आल्या या मोठ्या पराभवानंतर आपण महाविकास आघाडीतनं बाहेर पडण्याचं मत ठाकरेंचे नेते आणि पदाधिकारी व्यक्त करायला लागले तेव्हापासूनच फडणवीसांशी दोन हात करणाऱ्या ठाकरेंकडनं भाजप सोबत हात मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेत असं बोललं गेलं. उद्धव ठाकरेंनी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांशी त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं

आदित्य ठाकरेंनी तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात फडणवीसांची तब्बल तीन वेळा भेट घेतली आहे. आम्ही फडणवीसांची खुल्या दिल्यानं भेटून त्यांच्याशी चर्चा करू जे काही चांगलं असेल त्याला पाठिंबा देऊ असंही त्यांनी स्पष्ट केलंय काही दिवसांपूर्वी तर सामनाच्या अग्रलेखातनं फडणवीसांवर स्तुतीस्तुमन उधळण्यात आली देवाभाऊ अभिनंदन या शीर्षकाखाली देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं चक्क कौतुक करणारा लेख सामनात छापून आला देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीचा दौरा करत विकास कामांचा शुभारंभ केलेला होता तेव्हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीच्या फडणवीसांनी केलेल्या विकास कामांवरनं सामनातनं कौतुक करण्यात आलं.

फडणवीसांनी सुद्धा हे चांगलं आहे धन्यवाद म्हणत या कौतुकाचा स्वीकार केला होता त्यामुळे विधानसभेच्या निकालानंतर ठाकरेंनी फडणवीसांशी वाढवलेली हीच जवळीकता ठाकरे भाजपच्या गाडीत बसतील असं म्हणण्याचं पहिलं कारण ठरतं

उद्धव ठाकरे भाजपच्या गाडीत बसतील असं म्हणणं दुसरं कारण म्हणजे अस्तित्व टिकवण्याची असणारी धडपड राज्यामध्ये 2009 पर्यंत युतीमध्ये भाजपला वरचड असणारी शिवसेना 2014 आणि 19 ला मात्र बॅकफुटवर आली त्यामुळे भाजप शिवाय आपलं अस्तित्व सिद्ध करणं हे शिवसेना वाढवण्यासाठी गरजेचं होतं त्यातूनच मग भाजपला सोडून महाविकास आघाडीत जात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यामुळे भाजप पुढे नमतं घेण्यापेक्षा ठाकरेंना लॉंग टर्मच राजकारण करायचंय हे तेव्हा स्पष्ट झालेलं पण आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ठाकरेंच्या हातातनं पक्ष आणि चिन्ह दोन्ही गेलं त्यामुळे ठाकरेंना अगदी शून्यापासून नाही पण नवा पक्ष आणि नवीन चिन्ह घेऊन नवीन सुरुवात करावी लागली.

लोकसभा निवडणुकीत राज्यातला भाजप विरोधी प्रमुख चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचे नेतृत्व समोर आलं त्यामुळे उद्धव ठाकरे भाजपला पुरून उरतील असं चित्र होतं आणि लोकसभेत महाविकास आघाडीला यश मिळालं असलं तरी ठाकरे मात्र कुठेतरी कमी पडलेत हे पाहायला मिळालं उलट एकनाथ शिंदेनी आपला स्ट्राईक रेट चांगला ठेवत ठाकरेंना धक्का दिल्याच्या चर्चा झाल्या दुसरीकडे विधानसभेत महाविकास आघाडीत वाईस वर्षा स्थिती पाहायला मिळाली काँग्रेस आणि शरद पवार गटाचा धुवा उडाला तर उद्धव ठाकरे सर्वाधिक 20 जागा जिंकत महाविकास आघाडीत नंबर वन राहिले पण तरीही त्यांचा आकडा हा शिंदे किंवा भाजपला दखल घ्यायला लावेल इतका मुळीच नाहीये त्यामुळे ठाकरेंसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय

कारण आता मागे पडला असला तरी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि सध्या तो केंद्रातला प्रमुख विरोधी पक्ष आहे दुसरीकडे शरद पवारांना विधानसभेत अपेक्षीत यश मिळालं नसलं तरी शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात की पवारांचे काही आमदार किंवा खासदार भाजपचे वाट सुद्धा धरू शकतात त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार सध्या अस्तित्वाची लढाई लढत असले तरी पवारांचा राजकीय अनुभव आणि त्यांच्या राजकीय खेळी आजवर सगळ्यांनीच पाहिल्यात त्यामुळे शरद पवार सहजासहजी आपला उरला सुरला पक्ष संपून देतील असं म्हणता येत नाही त्यामुळे ठाकरेंना सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट या तत्वानुसार परिस्थितीशी जुळून घेणं हे गरजेचं आहे
त्यातही मुंबई महानगरपालिका जिंकणं हे त्यांच्यासमोरच प्रमुख आव्हान असणार आहे त्यासाठीच त्यांना भाजप सोबत जाण्याशिवाय पर्याय नाहीये असं सांगितलं जातं यामुळे उद्धव ठाकरे भाजपच्या गाडीत बसतील असं म्हटलं जातं.

यानंतर उद्धव ठाकरे भाजपच्या गाडीत बसतील असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे ज्याचा आपण उल्लेख केला ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका राज्याच्या राजकारणात लॉंग टर्म राजकारण करण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुंबईची सत्ता खूपच महत्त्वाची ठरते. विधानसभेत ठाकरे गटाची मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्रात धूळ आणली आहे मुंबईतनं ठाकरे गटाला विधानसभेच्या 10 जागा मिळाल्यात त्यामुळे मुंबईत अजूनही उद्धव ठाकरेंना स्पेस दिसतीय
म्हणूनच महाविकास आघाडीत असतानाही ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिलाय त्यानुसार निवडणुकीची तयारी सुद्धा चालू केली आहे दरम्यान एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आता गळाला लावायला सुरुवात केली आहे आता शिंदेंना मुख्यमंत्री करत भाजपन स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतल्याच्या चर्चा लोकसभा आणि विधान सभेच्या वेळी झालेल्या शिंदेंनी स्वतःची ताकद सिद्ध करत आपली बार्गेनिंग पॉवर ही वाढवली निवडणुकांचं जागा वाटप सत्तेतील खातेवाटप अशा सगळ्याच पातळ्यांवर शिंदे भाजपला जड गेल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदेंना वरचड होऊ न देणं यासाठी भाजपचं प्रयत्न सुरू झाल्याचं म्हटलं जातंय अशा वेळी भाजप आणि उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेसाठी सेटलमेंट करू शकतात असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत
मुंबई महानगरपालिकेत आम्हाला सांभाळा बाकी सगळं तुमच्याकडे राहू द्या या मुद्द्यांवरन ठाकरे भाजपला साथ घालू शकतात त्यामुळे भाजपच्या मदतीनं उद्धव ठाकरेंना ताकद वाढवणं सोपं जाऊ शकतं आणि शिंदेना शह देण्यासाठी भाजपला सुद्धा ठाकरेंना सोबत घेणं फायद्याचं होऊ शकतं म्हणूनच उद्धव ठाकरे भाजपच्या गाडीत बसू शकतात असं सांगितलं जातंय

उद्धव ठाकरे भाजपच्या गाडीत बसतील याचं चौथं आणि शेवटचं कारण म्हणजे स्वतः भाजपची असलेली सुप्त इच्छा राज्यामध्ये भाजप स्ट्रॉंग असली तरी केंद्रात भाजपची सत्ता ही अनेक टेकूंवर उभी आहे चंद्राबाबूंचा टीडीपी आणि नितीश कुमारांचा जेडीयू भाजप वरती नेहमी टांगती तलवार ठेवत अनेक निर्णयांमध्ये खोडा घालतो हे दिसून येतं अशा वेळी समविचारी पक्ष सोबत घेणं केंद्रात भाजप साठी अत्यंत महत्त्वाचं आहे आता केंद्रामध्ये उद्धव ठाकरे यांचे तब्बल नऊ खासदार आहेत शरद पवारांच्या सुद्धा सहा ते सात खासदारांना गळाला लावण्याच्या प्रयत्नात भाजप असल्याचं बोललं जातं त्यामुळे अशा वेळी जर ठाकरेंच्या नऊ खासदारांची भाजपला साथ मिळाली तर केंद्रात भाजपची सत्ता जास्त भक्कम होऊ शकते यामुळेच उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याची खेळी भाजप साठी महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जातंय
तसंच यावर्षी बिहारची सुद्धा विधानसभेची निवडणूक होणार आहे तिथं भाजप आपला स्वतःचा मुख्यमंत्री बसवण्याच्या तयारीत आहे त्यातनं नितीश कुमार आणि भाजपमध्ये पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे नितीश कुमारांचे 12 खासदार आहेत त्यामुळे बिहारच्या सत्तेवरनं नितीश कुमार भाजपला केंद्रात धक्का देण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर ठाकरेंचे नऊ खासदार असल्यानं बिहारच्या निवडणुकीपूर्वीच भाजप ठाकरेंना चुचकारून आपल्या बाजूने घेऊ शकतं असं बोललं जातंय आता या सगळ्या घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात भाजप एक हात पुढे करतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे खरंच भाजपच्या गाडीत बसतील का आणि तसं झालं तर फायदे तोट्याचं गणित कोणाला महागात पडणार आणि कोणाच्या पत्थ्यावर पडणार याबद्दलची तुमची मत कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा.

Leave a Reply