kanda bajarbhav : पुढील आठवड्यात कसे असतील कांदा बाजारभाव…

kanda bajarbhav: मागील आठवड्यापासून कांदा आवकेत वाढ होत असल्याने या आठवड्यात बाजारभाव पडल्याचेच दिसून आले. एकट्या नाशिक जिल्ह्यात दररोज लाल आणि पोळ कांद्याची सरासरी दीड लाख क्विंटल आवक होत असून राज्यात दररोज सरासरी साडेतीन लाख आवक होत आहे. त्यामुळे कांदा भाव पडले आहेत.

या आठवड्याच्या सुरूवातीला म्हणजेच सोमवारी राज्यात एकूण ४ लाख ३८ हजार क्विंटल कांदा आवक झाली. त्यानंतर दररोज साडेतीन ते पावणेचार हजार आवक होत आहे. गुरुवारनंतर आवक घसरते असा बाजाराचा कल असतो. मात्र गुरुवारनंतरही कांदा आवक टिकून राहिली आणि काल शुक्रवारी ही आवक ३ लाख ४८ हजार क्विंटल इतकी होती. दरम्यान पुणे, सोलापूर, नगर या बाजारांतही कांदा आवक वाढली आहे.

दुसरीकडे राज्यात उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात येथेही कांद्याचे बाजारभाव (onion market rate in Delhi)  कोसळले आहेत. गुजरातमधील भावनगर येथे सर्वाधिक कांदा आवक होते, तिथे लाल कांद्याला १६३५ ते १७०० रुपयांच्या आसपास सरासरी प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे. हरियाणामध्येही कांद्याचे बाजारभाव कमी होऊन सरासरी २ ते अडीच हजार, दिल्ली मध्ये १७०० ते २५०० रु. सरासरी प्रति क्विंटल, कर्नाटकमध्ये सुमारे २ ते ३ हजार प्रति क्विंटल सरासरी दर, मध्यप्रदेशमध्ये १५०० ते १८०० रुपये प्रति क्विंटल सरासरी असे दर आहेत.

सोलापूर येथील कांदा आडतदारांनी दिलेल्या माहितीनुसार आंध्रप्रदेशमधील शेतकऱ्यांनी पुन्हा कांदा लागवड केली, त्याची आवक सध्या त्याच्या बाजारात होत असल्याने आपल्याकडील म्हणजेच महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कमी आहे. परिणामी भाव कमी होते.

भाव वाढणार
दरम्यान बाजारभाव वाढले तरी संक्रांतीनंतर ते स्थिरावू शकतात असा अंदाज सोलापूर बाजारातील आडतदारांनी वर्तविला आहे. कृषी २४ शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्यानुसार शनिवारी व्यापारी सोलापूरला मोठी खरेदी करतील. कारण नंतर येणारी रविवार आणि सिद्धेश्वर यात्रा यामुळे बाजारबंद राहतील. त्यानंतर हेच व्यापारी मग नाशिक आणि नगरकडे कांदा खरेदीसाठी मोर्चा वळवतील त्यातून सोमवारी भाव वाढतील किंवा स्थिरावतील अशी शक्यता आहे.

Leave a Reply