Maharashtra Update: या आठवड्यात कशी असणार थंडी, जाणून घ्या हवामानाचा अंदाज..

Maharashtra Update: प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 10, 12, 13 व 14 जानेवारी रोजी हवामान कोरडे राहण्याची तर उत्तर भागात दिनांक 11 जानेवारी रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही तर पुढील दोन दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान सोमवारी दि. १५ व १६ डिसेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रात पहाटे ५ चे किमान तापमानं हे बऱ्याच ठिकाणी एक अंकी संख्येवर आले असून ही तापमाने सरासरीपेक्षा २ ते ६ डिग्रीपर्यंत खालावून जळगांव अहिल्यानगर, छ. सं. नगर बुलढाणा धाराशिव परभणी नांदेड अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर वर्धा ह्या सर्व जिल्ह्यात ह्या दोन दिवसात थंडीची लाट व काही जिल्ह्यात थंडीची लाटसदृश्य स्थितीची शक्यता आहे.

सध्या जाणवत असलेली अपेक्षित थंडी बुधवार दि. १८ डिसेंबर(संकष्टी चतुर्थी)पर्यंत टिकून राहण्याची शक्यता ही कायम असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

खान्देशांतील नंदुरबार धुळे जळगांव अशा तीन जिल्ह्यात काही ठिकाणी सरासरी असलेल्या साधारण दवांक बिंदू तापमान व वाढलेल्या आर्द्रतेमुळे अति खालावलेल्या किमान तापमानातून, भू-स्फटिकीकरण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
म्हणजेच दव गोठू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *