
काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार अशी चर्चा सुरू असतानाच पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव समोर आलंय वरिष्ठांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान पृथ्वीराज चव्हाण नवी दिल्लीला रवाना झाल्याचं सांगितलं जातंय काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी सतीश पाटील आणि विश्वजीत कदम यांची नाव सुद्धा चर्चेत आहेत दरम्यान पुढच्या दोन ते तीन दिवसात नवी दिल्लीत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची नियुक्ती करण्यासाठी बैठक होणार आहे. आणि त्यातच अंतिम निर्णय होईल शिवसेना उभाच मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला घरचा आहेर देण्यात आलाय देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी हे एक त्रांगण झालंय अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न सामनाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे या दोन्ही आघाड्या निस्तेज आणि निष्क्रिय ठरतात का तसं असेल तर देशासाठी हे बरं नाही असं सामनातल्या लेखात नमूद करण्यात आलाय नॅशनल कॉन्फरन्स आणि इंडिया आघाडीचे नेते ओमर अब्दुल्ला यांच्यावर सुद्धा सामनातून प्रहार करण्यात आलाय.
इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीच्या पुरतीच जन्माला आली आता गरज संपल्यानं इंडिया आघाडी बरखास्त केली पाहिजे या आघाडीकडे ना कोणता खास कार्यक्रम आहे ना नेतृत्व असं अब्दुल्ला म्हणाले होते या विषयावर त्यांनी वाचा फोडली होती आणि संबंधितांना खडे बोलही सुनावले होते त्यामुळे जुनियर अब्दुल्ला यांचे सूर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलले आहेत असा टोला ही सामनातून लगावण्यात आलाय तिकडे पंजाब आणि दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात उभी आहे एवढेच नाही तर काँग्रेस अनेक राज्यात स्वबळावर लढू शकत नाही दरम्यान इंडिया आघाडीत जो विस्कळीतपणा आलाय तो सावरण्याची जबाबदारी अंतिमतः कोणाची असा प्रश्नही सामनामधून उपस्थित करण्यात आला आहे इंडिया आघाडी अधिक मजबूत व्हावी टिकावी आणि या देशाच्या राजकारणामध्ये अधिक पुढे जावी ही आमच्या सगळ्यांचीच भावना आहे. पण गेल्या काही दिवसात पासून आमचे काही घटक पक्ष हे या भूमिकेत आहेत की संवाद तुटलेला आहे.