
Orange-mossambi and pomegranate : सध्याच्या वातावरणात शेतकऱ्यांनी लिंबूवर्गीय पिकांची आणि डाळिंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने या आठवड्यासाठी पुढील प्रमाणे कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे.
संत्रा-मोसंबीची काळजी:
१. मृग बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी 00:52:34 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२. आंबे बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्याची छाटणी करावी व छाटणी केलेल्या फांद्यावर बोर्डो पेस्ट लावावी.
३. संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
डाळिंबाचे व्यवस्थापन:
१. काढणीस असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी. डाळींब फळांची काढणी झाल्यानंतर बागेतील वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात व बाग स्वच्छ करावी.
२. डाळींब बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.