
soybean bajarbhav : हमीभाव खरेदी केंद्रांची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढविल्यानंतर बाजारसमितीतील सोयाबीन खरेदीचे दर वाढतील अशी अपेक्षा होती. मात्र हे दर फारसे वधारलेले नाही. असे असले तरी लातूर बाजारसमितीत बाजारभाव स्थिर राहिल्याचे दिसून आले. दरम्यान सरकारी केंद्रांवरील हमीभाव खरेदी सुरळीत असती आणि दिलेले लक्ष्य पूर्ण झाले असते, तर बाजारातील दरही वधारले असते असे सांगितले जात आहे.
सोमवारी लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची सुमारे १९ हजार क्विंटल आवक झाली. कमीत कमी दर ३७७६ रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त ४२६५ रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी ४१०० रुपये प्रति क्विंटल असे होते.
अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनची सुमारे साडेचार हजार क्विंटल आवक झाली. कमीत कमी ३६०० रुपये, जास्तीत जास्त ४२०० रुपये आणि सरासरी ४१०० रुपये असे दर होते. वाशिम बाजारात सोयाबीनला कमीत कमी ३८५०, जास्तीत जास्त ४७०० रुपये आणि सरासरी ४२०० रुपये बाजारभाव मिळाले. दरम्यान लासलगाव बाजारात सोयाबीनला सरासरी ४१०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.
अमरावती बाजारात पिवळ्या सोयाबीनची सुमारे दहा हजार क्विंटल आवक झाली. कमीत कमी ३८५० रुपये, जास्ती जास्त ४ हजार ५० रुपये आणि सरासरी ३९५० रुपये आवक झाली.