
kanda market: मागील आठवड्यातील संक्रांतीच्या सुटीनंतर जेव्हा या आठवड्यात बाजार सुरू झाले, तेव्हा कांद्याची जास्त आवक होऊन बाजार पडतील अशी शेतकऱ्यांना भीती वाटत होती. मात्र प्रत्यक्षात जास्त आवक होऊनही बाजार उसळले आणि सोमवारी पहिल्याच दिवशी लासलगाव बाजारात लाल कांदा सरासरी थेट २.५ हजार क्विंटलवर पोहोचला.
सोमवारी राज्यात कांद्याची विक्रमी म्हणजेच सुमारे ४ लाख क्विंटल आवक होती. नंतरही ही आवक थोडी कमी होऊन सरासरी तीन लाख राहिली. मात्र त्यानंतर कांदा दर थोडे घसरून २२ ते २३ रुपये सरासरी प्रति किलो आहेत. दरम्यान गुरुवार दिनांक २३ जानेवारी रोजी राज्यातील काही महत्त्वाच्या बाजारपेठेत कांद्याचे जास्तीत जास्त बाजारभाव हे ४ हजारांवर पोहोचले आहेत.
या बाजारात कांद्याचे खाल्ला चार हजारी भाव:
गुरुवारी लासलगावसह नाशिक जिल्ह्याचे बाजारही टिकून राहिल्याचे दिसून आले. सोलापूर बाजारात गुरुवारी एकूण २८ हजार क्विंटल कांदा आवक झाली. संक्रांतीच्या आधी होणाऱ्या कांदा आवकेच्या तुलनेत ही आवक आता घटली आहे. त्यामुळे दरही वाढले आहेत. सोलापूर बाजारात काल जास्तीत जास्त ४ हजार रुपये प्रति क्विंटल दर कांद्याल मिळाल आहे. तर सरासरी २१०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले आहे. आठवड्याच्या सुरूवातीपासून हे बाजारभाव टिकून राहिल्याचे म्हणता येईल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही कांद्याला जास्तीत जास्त ४ हजार बाजारभाव प्रति क्विंटलसाठी मिळाला. तर सरासरी १८०० रुपये दर होते. वाई जि. सातारा आणि हिंगणा-नागपूर येथेही जास्तीत जास्त ४ हजार प्रति. क्विंटलपर्यंत कांदा विकला गेला.
दरम्यान गुरूवारी लासलगाव बाजारात कांद्याची सुमारे २४ हजार क्विंटल आवक होऊन बाजारभाव कमीत कमी १ हजार, जास्तीत जास्त २८०० आणि सरासरी २३५१ रुपये इतके होते. येवला बाजारात सरासरी २१००, सिन्नर बाजारात २२५०, चांदवडला २२५०, मनमाडला २२०० रुपये इतके होते. सटाणा बाजारात २ हजारा रुपये सरासरी बाजारभाव मिळाला. पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याला सरासरी २२५० रुपये तर पुणे येथील बाजारात २३५० रुपये बाजारभाव मिळाला.