
maize prices: आज मुंबईत मक्याला सरासरी ३५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला, तर काल सिल्लोड बाजारात मक्याला सरासरी २१५० रुपये बाजारभाव मिळाला. दरम्यान सोमवारपासून सुरू झालेल्या या आठवड्यात मक्याचे बाजारभाव तुलनेने स्थिर आहेत.
मागील आठवड्यात नांदगाव बाजारात मक्याची किंमत रु. २२५० प्रती क्विंटल होती. गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यात किंमती समान आहे.
खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु. २२२५ प्रती क्विंटल आहे. सध्या मक्याच्या किंमती MSP पेक्षा जास्त आहेत.
बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या आवक मध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे २४.९४% व४१.५६% इतकी घट झाली आहे.
मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी अमळनेर बाजारात मक्याची सरासरी किंमत सर्वाधिक रु. २२८१/क्विंटल होती, तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वात कमी म्हणजेच २१११ रुपये प्रति क्विंटल इतकी होती.