Onion arrivals decreased : कांद्याची लासलगाव बाजारातील मागील सप्ताहातील सरासरी किंमती रु. ३०८३ प्रती क्विंटल होत्या. त्या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत किंमतींत ३०% वाढ झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या आवकमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे १६.९% व ५३.९२% इतकी घट झाली आहे.
तसेच मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी लासलगाव बाजारात कांद्याच्या सरासरी किंमत सर्वाधिक रु. ३०८३/क्विंटल होती, तर सोलापूर बाजारात सर्वात कमी किंमत रु. २०३३/क्विंटल होती.
दरम्यान आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या मुहूर्तावर लासलगाव, निफाड, पिंपळगाव बाजारसमितीतील कांदा बाजारभाव टिकून आहेत. आज पुणे जिल्ह्यातील पिंपरी बाजारसमितीत सकाळी लोकल कांद्याला सरासरी २५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. काल १८ फेब्रुवारी रोजी पुणे बाजारसमितीत कांद्याला २२५० रुपये बाजारभाव सरासरी प्रति क्विंटल मिळाला. या ठिकाणी काल सुमारे पावणे अठरा हजार क्विंटल कांदा आवक झाली. काल पुण्याच्या मांजरी बाजारात २५०० रुपये सरासरी बाजारभाव होता.
मंगळवारी लासलगाव बाजारात, निफाड उपबाजारात आणि विंचूर उपबाजारात उन्हाळी कांद्याची अनुक्रमे ७४३ क्विंटल, १६५ क्विंटल, ६४५ क्विंटल आवक झाली. लासलगाव बाजारात सरासरी २७०० रुपये प्रति क्विंटल, निफाडला २३४७, आणि विंचूला २६५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होते. दुसरीकडे लाल कांदयाचे लासलगाव बाजारातील दर सोमवारच्या तुलनेत काहीसे कमी झालेले पाहायला मिळाले. याठिकाणी लाल कांद्याची २२ हजार ८११ क्विंटल आवक होऊन सरासरी २६०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. सोलापूर बाजारात लाल कांदय्ाला सरासरी २ हजार रुपयांचा प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.












