Santosh Deshmukh Murder: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करून त्यांच्या मृतदेहासोबत हसत हसत सेल्फी काढतानाचे फोटो कालपासून व्हायरल होत असल्याने बीडसह संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पुन्हा संतापाची लाट उसळली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही हे फोटो पाहून संताप व्यक्त केला असून त्यांनी हॉस्पिटलमधून थेट बीड गाठले आहे. दुसरीकडे बीडची परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता लक्षात घेता बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई हकूम जारी केला आहे.
दरम्यान मनोज जरांगे यांनी आक्रमक होत आरोपींना गोळ्या घाला अशी मागणी केली आहे, तसेच तुम्ही काही केले नाही, तर आम्ही करू अशी थेट आक्रमक भाषा केल्यानंतर आता बीडचे लोन थेट राज्यभरपसरले आहे. आमदार सुरेश धस यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यातच आता मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधीही पडू शकतो. मात्र हा संताप असाच वाढत जाणार असल्याचे दिसून येत असून वाल्मिक कराड आणि त्याच्या गुन्हेगार साथीदारांचे आता एन्काऊंटर होणार अशी कुजबून राजकीय वर्तुळात बोलून दाखवली जात आहे.
मंत्री मुंडेची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणी वाल्मिक कराडला खास ट्रिटमेंट*
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या घोषणा होणार आहेत. मात्र त्यावर मंत्री मुंडे यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सावट असून विरोधक गोंधळ करण्याची शक्यता आहे. अशातच आता बीडमधील परिस्थिती चिघळून हाताबाहेर जाण्याच्या स्थितीत असून त्याचा वणवा राज्यातही पेटत आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी तुरुंगात असलेल्या गुन्हेगार वाल्मिक कराडला खास ट्रिटमेंट देत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यामुळेही जनतेमध्ये रोष असून हा रोष असाच धुमसता राहिला, तर अधिवेशनाच्या काळात महाराष्ट्र पेटू शकतो, हे लक्षात घेता लवकरच गुन्हेगारांचा एन्काऊंटर होऊ शकतो, असे वर्तविले जात आहे.
मुखमंत्र्याकडून मुंडेंची मंत्री मंडळातून हकालपट्टी.
अधिवेशनात विरोधक गुन्हेगाराशी संबंधित असलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणार असल्याचे लक्षात येताच आणि मस्साजोग घटनेने पुन्हा एकदा आक्रमक वळण घेतल्याने अखेर धनंजय मुंडेंना मुखमंत्री यांनी राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे.
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.
दोनच दिवसांपूर्वी धनंजय मुंडे राजीनामा देतील असे वक्तव्य त्यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांनी केले होते. मात्र काल मुंडे स्वत: अधिवेशनात उपस्थित होते. राजीनामा घेतला जाऊ नये यासाठी धनंजय मुंडे यांनी महंत नामदेव शास्त्रींपासून तर तब्येतीचे कारणे देत बरेचदा भावनिक गुंता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे सर्वच राजकीय डाव फोल ठरले आणि राजीनामा देण्याची वेळ आली. त्यांच्यावरही आता या प्रकरणात गुन्हा नोंदला जाणार का? असा प्रश्न राजकीय विरोधक करत आहेत.
देशमुख हत्या प्रकरणामधील फोटो समोर आल्यावर सोमवारी (3 मार्च) रात्री उशिरा राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. सोमवारी रात्री देवगिरी बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज (४ मार्च) ला मुख्यमंत्री यांनी मुंडेंची मंत्री मंडळातून हकालपट्टी केली.
आज बीड जिल्हा बंद चे आवाहन
आज विविध संघटनांनी बीड जिल्हा बंदचे आवाहन केले आहे , हे लोन पूर्ण राज्यभर पोहचू शकते त्यामुळे सरकार आता आकॅशन मोड वर आले आहे.












