
Maize Market price : आज महिला दिनाच्या म्हणजेच ८ मार्चच्या दिवशी सकाळच्या सत्रात अहिल्यानगर जिल्हयात पिवळ्या मक्याची २७९ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव २ हजार रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त २३०० रुपये प्रति क्विंटल मिळाले. सरासरी २३०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. दरम्यान पुणे बाजारात लाल मक्याला सरासरी २५५० रुपये बाजारभाव मिळाले.
दरम्यान संपूर्ण आठवडाभर दरदरोज सरासरी १७ ते १८ क्विंटल मका आवक बाजारात होत असून काल शुक्रवारी मात्र त्यात घट होऊन ती अवघी ८ हजार क्विंटल इतकी झाली. शुक्रवार दिनांक ७ मार्च रोजी मुंबई बाजारात लोकल वाणाच्या मक्याला सरासरी ३५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.
त्याखालोखाल जालना बाजारात सफेदगंगा मक्याला सरासरी २९०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. पुणे बाजारात लाल मक्याला २६०० रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव मिळाला. सोलापूर बाजारात हायब्रिड मक्याला सरासरी २४०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.
अहिल्यानगर जिल्हय्ातील बाजारात पिवळ्या मक्याला सरासरी २३०० रुपये, तर इतर वाणाला सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाल्याचे दिसून आले. छत्रपती संभाजीनगरला पिवळ्या मक्याल २२०० रुपये प्रति क्विंटल, तर धुळे बाजारात याच प्रकारच्या म्हणजे पिवळ्या मक्याला २१२३ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.