kanda bajarbhav : बाजारातील आवक उतरणीला; कांदा बाजारभाव वाढले..

Onion prices increased : मागच्या सोमवारच्या तुलनेत या सोमवारी म्हणजेच आठवड्याची सुरुवात होताना दिनांक ९ जून रोजी कांद्याची राज्यातील आवक घसरलेली दिसत आहेत. तर भावही स्थिर असल्याचे दिसून येत आहे. मागच्या सोमवारी राज्यात सुमारे ४ लाख क्विंटलपेक्षा जास्त कांदा आवक होती, तर या सोमवारी ती अवघी २ लाख ७५ हजार क्विंटल इतकी आहे.

जून महिन्यात आवक घटण्याचे संकेत असून अनेकांनी कांदा चाळीत साठवला आहे. त्याचाही परिणाम आवकेवर होणार असल्याचे समजत आहे. यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढणार असल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान मंगळवार दिनांक १० जून रोजी राज्यात पिंपळगाव बसवंत येथे पुन्हा चांगला दर राहिला. आज पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांद्याची ३० हजार क्विंटल आवक होऊन किमान ५२५ रुपये, कमाल २४२५ रुपये तर सरासरी १६०० रुपये प्रति क्विंटल कांदा बाजारभाव मिळाले. लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याची १३ हजार ५०० आवक क्विंटल आवक होऊन किमान ६०० कमाल २१०० आणि सरासरी १६०० रुपये बाजारभाव मिळाले. कळवण बाजारात सरासरी १४००, चांदवडला १४८०, मनमाडला १५०० आणि देवळा बाजारात १५५० रुपये सरासरी बाजारभाव राहिले.

सोलापूर बाजारात लाल कांद्याला किमान १०० रुपये तर कमाल २५०० रुपये आणि सरासरी २५०० रुपये दर मिळाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथे उन्हाळी कांद्याला किमान ६००, कमाल २२०० आणि सरासरी १४५० रुपये असा बाजारभाव मिळाला.

पुणे बाजारातील लोक कांद्याचे दरही वधारले असून कमाल २ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. किमान ५०० आणि सरासरी १२५० रुपये प्रति क्विंटल असे दर येथे आहेत. मोशी बाजारात सरासरी १२५०, खेड चाकण बाजारात सरासरी ११००, शिरूर बाजारात सरासरी १३००, तर दौंड केडगाव बाजारात सरासरी १४०० रुपये बाजारभाव मिळाले. जुन्नर-आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला सरासरी १५०० रुपये बाजारभाव मिळाला.

सांगली बाजारात ११००, कराड बाजारात १८००, तर सातारा बाजारात १४०० रुपये सरासरी बाजारभाव सातारा जिल्ह्यात मिळाला. नागपूरला पांढरा कांद्याला सरासरी १४०० रुपये, हिंगणा येथे लाल कांद्याला सरासरी १५०० रुपये, तर रामटेक येथे उन्हाळी कांद्याला सरासरी १४०० रुपये बाजारभाव प्रति क्विंटलसाठी मिळाला.