maharashtra rain update: पावसाची दोन आठवड्यांची उघडीप! राज्यात बहुतेक भागांत पावसाचा जोर कमी…

maharashtra rain update:  दिनांक ११ जुलैपासून पावसाचा जोर कमी व्हायला सुरूवात झाली आहे. पुढील दोन आठवडे म्हणजेच २४ जुलैपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाचे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. मुंबईसह कोकण भाग वगळता राज्यात फारसा पाऊस न पडता, आकाश बहुतांशी ढगाळ तर कधी कधी उघडे राहणार असल्याचे दिसते.

श्री.खुळे यांच्या अंदाजानुसार, मुंबई व कोकणात या काळात मध्यम स्वरूपाचा पाऊसच होईल. तर विदर्भ, सांगली, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये १६ व १७ जुलैला दोन दिवस मध्यम पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये १३ ते १६ जुलै या चार दिवसांच्या कालावधीत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

*या उघडीपीचे कारण काय?*
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व भारतात पावसाचा जोर वाढला आहे. हे प्रणाली पश्चिम बंगाल व ओडिशा राज्यांतून उत्तरेकडे आणि वायव्येकडे सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर येणारे मान्सून वारे कमकुवत झाले आहेत.

मान्सूनच्या मुख्य रेषेचे पश्चिम टोक काहीसे उत्तरेकडे सरकल्याने देखील राज्यात पावसाचा जोर कमी राहण्याची चिन्हे आहेत.

या व्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय हवामान घडामोडी – जसे की पॅसिफिक महासागरातील एल-निनो स्थिती – महाराष्ट्रासाठी पाऊस कमी करणारी ठरत आहे. त्यामुळे येत्या दोन आठवड्यांत पावसावर फारशा अपेक्षा ठेवता येणार नाहीत.

*शेतकऱ्यांसाठी सल्ला:*
ज्या भागात पेरणी झालेली नाही, तिथे पेरणीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी. आकाश ढगाळ असले तरी पावसाचा जोर दिसत नाही. पेरणी झालेल्या भागांमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन व आंतरमशागत पद्धती अंगीका10:31 AM