
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत कापूस बाजारभाव सरासरी ७ हजार ४०० ते ८ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये सरासरी दर ७ हजार ९० रुपये होता.
या दरातील घसरण मागील काही महिने जागतिक उत्पादनात घट, व्यापार धोरणे, आणि देशांतर्गत साठवणुकीच्या समस्यांमुळे झाली आहे. तरीही २०२५ च्या शेवटी दर पुन्हा स्थिरतेकडे जातील, असा अंदाज आहे.
USDA च्या माहितीनुसार भारतात २०२४-२५ मध्ये कापसाचे उत्पादन अंदाजे ३१५.९ लाख गाठी (प्रत्येकी ४८० पौंड) होईल. जागतिक उत्पादनही थोडक्याच प्रमाणात कमी होण्याचा अंदाज आहे. मागणी मात्र स्थिर आहे, त्यामुळे दरातील घसरण फार काळ टिकणार नाही.
राजकोट बाजारात मागील तीन वर्षातील किमती
* २०२२ मध्ये – ७९३९ रुपये,
* २०२३ मध्ये – ८७५० रुपये,
* २०२४ मध्ये – ७०८९ रुपये
कापूस हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे निर्यातक्षम पीक असून, सध्याही ८० टक्क्यांहून अधिक कापूस निर्यात भारतातून केला जातो. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत छोटासा बदलही देशांतर्गत दरांवर परिणाम करतो. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी साठवणूक, दर्जा आणि विक्री कालावधी याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे.