soybean bajarbhav: या खरीपातील सोयाबीनचे बाजारभाव या वर्षीही असणार हमीभावापेक्षा कमी?*

soybean bajarbhav : कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मागील वर्षाच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा घटला आहे. याचे कारण म्हणजे यंदा सोयाबीनला मिळालेला कमी बाजारभाव.

सोयाबीन उत्पादनात सध्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत घटक मोठा प्रभाव पाडत आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत सोयाबीनचा संभाव्य बाजारभाव ४६०० ते ५१०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहू शकतो असा अंदाज पुणे येथील बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षाच्या तज्ज्ञांनी वर्तवला आहे. यंदाच्या सोयाबीनच्या किंमतींची तुलना करता हे बाजारभाव फारसे आकर्षक नसल्याचे दिसतेय.

USDA च्या अंदाजानुसार:
* २०२५ मध्ये जागतिक सोयाबीन उत्पादन ४२६८ लाख टन होईल, जो मागील वर्षांच्या तुलनेत थोडा घटलेला आहे.
* भारतातही उत्पादनात फारशी वाढ न होता सुमारे १२५ लाख टन उत्पादन होईल.
* त्यामुळे बाजारात साठवणूक व दरात मोठी उसळ होण्याची शक्यता सध्या कमी आहे.

गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत सोयाबीनच्या सरासरी किमती:
* २०२२ मध्ये – ५२६९ रुपये,
* २०२३ मध्ये – ४९२७ रुपये,
* तर २०२४ मध्ये – अंदाजे ४६०० रुपये दरम्यान राहतील.

FAQ ग्रेडच्या सोयाबीनसाठी उच्च दर्जाचे दर मिळण्याची शक्यता आहे. मात्र मागणी कमी असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना ४८०० ते ५००० रुपयां दरम्यानच दर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोयाबीन निर्यातही मर्यादितच राहील कारण आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझीलसारख्या देशांतून मोठ्या प्रमाणात पुरवठा अपेक्षित आहे. परिणामी भारतातील दर तुलनेत स्थिर राहतील.