Maize sowing : यंदा मका पेरलाय? जाणून घ्या ऑक्टोबर ते डिसेंबरचे संभाव्य दर..

Maize sowing : सध्या खरीप हंगामात अनेक शेतकरी मका पिकाकडे वळताना दिसत आहेत. यामागे बाजारातील स्थिर मागणी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्पादनातील घट व देशांतर्गत पातळीवरील कमी साठा हे प्रमुख घटक आहेत.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी मका या पिकाच्या किंमती २२५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील तीन वर्षांतील तुलना करता, २०२३-२४ या वर्षात मका सरासरी २०३६ रुपये दराने विकला गेला होता, तर २०२४-२५ मध्ये तो दर सरासरी २ हजारत ते २५०० रुपये असेल, असा अंदाज आहे.

स्मार्ट प्रकल्पाच्या अंदाजानुसार
* भारतातील मक्याचे उत्पादन २०२४-२५ मध्ये थोडे वाढून सुमारे ३८० लाख टन होण्याची शक्यता आहे.
* मात्र, आंतरराष्ट्रीय उत्पादनात घट होऊन हे उत्पादन १२५.८ मिलियन टनांवर येईल, असे USDA ने नमूद केले आहे.
* यामुळे आयात कमी व निर्यातसुद्धा मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

मका उत्पादनात आघाडी घेणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना यांचा समावेश होतो. या देशांतील हवामानातील अनिश्चिततेमुळे जागतिक उत्पादन घटण्याचा धोका वाढला आहे. यामुळे भारतीय बाजारात मक्याची मागणी तुलनेत अधिक राहील.

या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून मका दर ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान वाढीच्या दिशेने जाऊ शकतो. मात्र हवामानातील बदल, निर्यातीवरील धोरणे आणि स्थानिक पातळीवरील साठा यावरही दराचे चढउतार अवलंबून असतील.