Ministry of Agriculture : बनावट खतांविरोधात केंद्रीय कृषी मंत्रालयाची विशेष मोहीम…

Ministry of Agriculture : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बनावट व निकृष्ट खतांच्या विरोधात तातडीने आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. देशभरात बनावट खतांची विक्री, अनुदानित खतांचा काळाबाजार तसेच सक्तीचे टॅगिंग यासारख्या बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने हे पत्र पाठवण्यात आले आहे.