Success story : एकाच शेतात धान + कापूस : प्रयोगशीलतेचा नवा अध्याय…

Success story : अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण दक्षिण भारतातील हवामानामध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोकण किनारपट्टीसह गोवा व मध्य महाराष्ट्र या भागांत येत्या काही दिवसांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार आहे.

ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे समुद्र खवळण्याची शक्यता असून, त्यामुळे मच्छीमारांना पुढील आदेश येईपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा तटरक्षक दलाने दिला आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांवर आणि उघड्यावर ठेवलेल्या कृषी उत्पादनांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना पिके सुरक्षित स्थळी हलविण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होईल. हवामान विभागाने सांगितले आहे की, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र येत्या सोमवारपर्यंत ‘मोंथा’ नावाच्या चक्रीवादळात परिवर्तित होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि ओडिशा या राज्यांना उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ २८ ऑक्टोबरच्या संध्याकाळी आंध्र प्रदेश किनाऱ्याजवळील काकीनाडा आणि मछलीपट्टणम या दरम्यान किनारा ओलांडण्याची शक्यता आहे. त्या काळात जोरदार पाऊस, तीव्र वारे आणि समुद्रातील भरती यांचा सामना करावा लागू शकतो.