livestock farmers : दुभत्या जनावरांना उसाचे वाढे खायला देणं योग्य की अयोग्य, जाणून घ्या सविस्तर…

  • livestock farmers : दुभत्या जनावरांना उसाचे वाढे खायला देण्याबाबत अनेकदा संभ्रम असतो, कारण ते दिसायला हिरवेगार असले तरी त्यामध्ये आवश्यक पोषणमूल्य मर्यादित असते. आहारशास्त्रानुसार उसाचे वाढे हे इतर हिरव्या वैरणीइतके पोषक नसून त्याचा समावेश वाळलेल्या चार्‍यातच केला जातो. तरीही मर्यादित काळात सहज उपलब्धतेमुळे अनेक पशुपालक त्याचा वापर करतात. अशा वेळी उसाच्या वाढ्यांसोबत सकस हिरवी वैरण, संतुलित आहार आणि योग्य प्रमाणात खनिज मिश्रण देणे अत्यंत आवश्यक ठरते. तसेच चुन्याची निवळी योग्य प्रमाणात वापरून प्रक्रिया केल्यास वाढ्यांचा उपयोग सुरक्षितपणे करता येतो, मात्र यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही हितावह ठरते.
  •  
  • ◼️ उसाचे वाढे दिसायला हिरवेगार असले तरी त्यामध्ये पोषणमूल्य फारच कमी असते.
  •  
  • ◼️ उसाचे वाढे खाऊ घातल्यास दूध उत्पादनात घट होते.
  • ◼️ गाभण जनावरांना आवश्यक पोषक घटक मिळत नाहीत, त्यामुळे पोटातील वासराच्या वाढीवर परिणाम होतो.

  • ◼️ वासराची शारीरिक वाढ नीट होत नाही.

  • ◼️जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसचे संतुलन बिघडते.

  • ◼️ उसाच्या वाढ्यांमध्ये ऑक्झलेट व नायट्रेटचे प्रमाण जास्त असते.

  • ◼️ऑक्झलेट कॅल्शियमशी संयोग होऊन कॅल्शियम ऑक्सालेट तयार होते.

  • ◼️ हे कॅल्शियम लघवी व शेणावाटे शरीराबाहेर टाकले जाते.

  • ◼️ कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यामुळे दूध उत्पादन घटते.

  • ◼️जनावर वेळेवर गाभण राहत नाहीत, वारंवार उलटतात किंवा गर्भपात होऊ शकतो.

  • ◼️ या सर्व कारणांमुळे पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान होते.