शेतकऱ्यांनी शेतीसोबत विविध व्यवसाय करावेत त्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते . शेतकऱ्यांनी शेतीसोबत मधुमक्षिकापालन सुरू करावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे .
मधुमक्षिकापालनासाठी विशेष अभियान.
कृषी विभागाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मधुमक्षिकापालन व्यवसायाकडे वळावे यासाठी विशेष अभियान हाती घेतले आहे. सरकारने राज्यातील व राज्याबाहेरील शेतकऱ्यांना या अभियानाचे प्रशिक्षण मिळण्यासाठी २८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. फलोत्पादन विभागाने हे अभियान चार टप्प्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी परिसंवाद.
तीन लाख रुपये खर्च करून नाशिकमध्ये परिसंवाद घेतला जातोय. तसेच , आठ लाख रुपये खर्च करून नागपूर,लातूर, सातारा, अमरावतीमध्ये विभागीय परिसंवाद घेतले जाणार आहेत. लातूर, पुणे , यवतमाळ व जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या जिल्हा साठी सात लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खास राज्याबाहेर प्रशिक्षण.
मधुमक्षिकापालनासाठी काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तांत्रिक प्रशिक्षण घेण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. यामध्ये जळगाव, पुणे , कोल्हापूर, औरंगाबाद, चंद्रपूर , ह्या जिल्ह्यांमधील शेतकरी समाविष्ट आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दहा लाख रुपये खर्च करून खास राज्याबाहेर प्रशिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
उद्योजकता विकास वाढण्यासाठी पुढाकार.
शेतकऱ्यांसाठी या क्षेत्रातील संधी नावीन्यपूर्ण मार्गाद्वारे नेण्यासाठी फलोत्पादन विभाग आणि कृषी विभाग धडपडत करत आहेत. मधुमक्षिकापालनातील उद्योजकता विकास या अभियानामुळे वाढू शकतो. या मुळे देशातील तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांसाठी परिसंवाद घडवून आणले जात आहेत. अशी माहिती फलोत्पादन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.