राज्यसरकारची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना संपूर्ण माहिती…

nanaji deshmukha yojana

राज्य शासनामार्फत महाराष्ट्रातील अल्प व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनाचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी सरकारने 4,000 कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव 2023 साठी मंजूर केला आहे.या योजनेमार्फत राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार लागवड करण्यावर भर दिला जाणार आहे ,तसेच हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये शेतकऱ्यांना मदत होणार आहे.

राज्यातील ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घायचा आहे त्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागणार आहे. हि योजना  महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यामधील ५१४२ गावांमध्ये हि योजना सुरु केली जाणार आहे.

 नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे उद्दिष्ट:

आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना रोज एक ना एक संकटांचा सामना करावा लागत असतो . त्यापैकी सगळयात मोठी समस्या म्हणजे पाण्याचा अभाव , त्यामुळे दुष्काळ पडतो, यामुळे शेतकरी सक्षम होण्यास कमी पडतो.काही संकटांचा सामना शेतकरी करू शकत नाही व आत्महत्या करतात,हे महाराष्ट्र सरकारने लक्षात घेऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना २०२३ सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकार या योजनेच्या अंतर्गत दुष्काळी भाग दुष्काळमुक्त करणार आहे. यामुळे शेतकरी चांगल्याप्रकारे शेती करू शकतील व त्यांचे उत्पन्न वाढेल .

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनाचे फायदे :

– अल्प व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना या योजनाचा लाभ मिळणार आहे.

– या योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यावरही लक्ष केंद्रित केले जाते.

– 4000 कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी राज्य सरकार करणार. . तसेच या योजनेच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळी भाग दुष्काळमुक्त करणार आहे . ज्यामुळे शेतकरी चांगल्याप्रकारे शेती करू शकतील .

– महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू करण्यासाठी जागतिक बँकेकडून सुमारे 2,800 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.

या योजनेंतर्गत देण्यात येणारे प्रकल्प

पाण्याचा पंप

वर्मी कंपोस्ट युनिटशिंपड सिंचन प्रकल्प

शेळीपालन युनिटचे ऑपरेशन

फलोत्पादन अंतर्गत वृक्षारोपण प्रकल्प इ.

महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी यादी

ठिबक सिंचन प्रकल्प

बियाणे उत्पादन युनिट

अर्ज करणारा हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा, या योजनेचा अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने करू शकता. याअर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

पासपोर्ट आकाराचा फोटो
ओळखपत्र
आधार कार्ड
मोबाईल नंबर
पत्त्याचा पुरावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *