कांदाचाळ उभारणीसाठी रोहयोअंतगर्त 1 लाख 40 हजारांचं अनुदान देण्याचा निर्णय रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी घेतला आहे. रोहयो निर्णयामुळे सर्व राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी खुश झाले आहेत .
गेल्या काही महिन्यापासून कांद्याचे दर खूप प्रमाणावर घसरल्याने शेतकऱ्यांना त्याचा खूपच मोठा फटका बसला आहे अशातच शिंदे आणि फडणवीस सरकारच्या रोजगार हमी योजना विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.रोजगार हमी योजनेअंतर्गत कांदा चाळ उभारण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. तसेच त्यावर अनुदान देखील देणार आहे.
सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. दरवर्षीच मोठ्या प्रमाणावर शेतकरी कांद्याची लागवड करतात त्यामुळे एकदाच सगळ्यांचा कांदा विक्रीसाठी बाजारात येतो. यादरम्यान मार्केटमध्ये आयात जास्त झाल्यामुळे कांदाच्या किमती खूप प्रमाणात कमी होतात व याचा परिणाम शेतकऱ्यांना रस्त्यावर कांदा फेकून द्यावा लागतो. विशेषता कांद्याच्या किमतीमध्ये सतत चढ-उतार चालूच असतो कांदा साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांकडे कोणताही पर्याय नसल्यामुळे कांदा खराब होण्याच्या भीतीपोटी जास्त तर शेतकरी आहे त्या भावात कांदा विकून मोकळे होतात.
त्यामुळे बाजारपेठेत योग्य दर येईपर्यंत कांदा साठवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना कांदा चाळ असणे गरजेचे असते . परंतु कांदा चाळ तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर खर्च देखील येतो. तो शेतकऱ्यांना काहीसा परवडणारा नसतो परंतु आता रोजगार हमी योजनेअंतर्गत कांदा चाळ उभारण्यासाठी एक लाख ४० हजाराचे अनुदान दिले जाणार आहे.
नेमकी कशी असणार योजना
▪️ रोजगार हमी योजनेअंतर्गत ४ लाख ५८ हजार ७३० रुपये एवढा खर्च कांदा चाळ उभारणीसाठी येणार आहे .
▪️ त्यामध्ये ९६ हजार २२० रुपये कांद्याच्या मंजुरीसाठी अनुदान दिले जाईल.
▪️ तसेच 64,हजार 147 रुपये इतका साहित्यांसाठी लागणारा खर्च ही मिळणार आहे.
▪️साहित्याचा व मंजुरीचा एकूण १
लाख ६० हजार ३६७ रुपयांचा खर्च कांदा चाळ बांधण्यासाठी रोहयोअंतर्गत दिला जाणार आहे.
▪️कांदाचाळीची लांबी 12 मीटर तर उंची 2.95 मीटर व रुंदी 3.90 मीटर इतकी असणार आहे.
▪️कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सामूहिक रित्या किंवा वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारे कांदा चाळ उभरता येणार आहे
▪️त्याचप्रमाणें महिला बचत, गट शेती गट इत्यादींनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.