पावसाळ्यात घ्या ही तीन पिके, कमीत -कमी गुंतवणूक करून लाखो रुपये कमवा…

पावसाळ्यात घ्या ही तीन पिके, कमीत -कमी गुंतवणूक करून लाखो रुपये कमवा...

आता काहीच दिवस पावसाळा सुरू होण्यासाठी उरले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून राज्यामध्ये दाखल होणार आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कमी खर्चात ,कमी वेळेत जास्त उत्पन्न तसेच जास्त कमाई कशी करू शकतो हे पाहणे आवश्यक आहे याविषयी आज आपण पाहणार आहोत.

पावसाळ्यात या पिकांची लागवड करण्याचा खर्च काही हजारांमध्ये असतो या पिकांची काही खास वैशिष्ट्ये देखील असणार आहे त्यामुळे ते इतर पिकांपेक्षा वेगळे आहेत. जे शेतकरी आत्ताच शेती करायला लागलेले आहेत तेही या पिकांची लागवड सहजतेने करू शकतात . या पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा कमी प्रमाणात होत असतो त्यामुळे फवारणीचा खर्च देखील वाचतो.

त्यामध्ये पालक या पिकाची लागवड खूप प्रसिद्ध आहे. मागील काही वर्षापासून शेतकरी पावसाळ्यामध्ये पालक या पिकाची लागवड करून मोठी कमाई केली आहे. ऑगस्ट, सप्टेंबर ,ऑक्टोबर मध्ये पालकाला जास्त भाव मिळत असतो अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जून ,जुलै पर्यंत पालक बियांची पेरणी करून टाकावी.45 ते 50 दिवसात पालक हा विक्रीसाठी येतो पालकाची कापणी पाच ते सहा वेळा होते . पालकाची एक एकर लागवड करण्यासाठी सुमारे 15000 रुपये इतका खर्च येतो या पिकापासून तुम्ही तीन महिन्यापर्यंत सुमारे दीड लाख रुपये कमवू शकता.

दुसरे पीक म्हणजे कोथिंबीर या पिकाला पावसाळ्यात देखील खूप मागणी असते याचीही लागवड ही जून जुलैमध्ये केली जाते. शेतकऱ्यांना एक एकर कोथिंबीर ची लागवड करण्यासाठी किमान 20000 रुपये खर्च येत असतो व त्याच्यातून पुढील तीन महिने उत्पन्न मिळत असते यातूनही शेतकरी खूप कमाई करू शकतो .

पालक व कोथिंबीर याचप्रमाणे आपण मेथीची देखील लागवड करू शकतो या लागवडीसाठी 10000 इतका खर्च येतो या पिकापासून शेतकरी हा 45 ते 50 हजार रुपये कमवू शकतो व मेथीची पेरणी केल्यानंतर विक्रीसाठी येईपर्यंत 45 ते 50 दिवस लागतात या तिन्ही भाज्यांची लागवड केली तर शेतकरी कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळू शकतात .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *