खानदेश हा सातपुडा पर्वतालगतचा प्रदेश आहे .सातपुड्यात पशुधन पक्षांच्या विविध प्रकारच्या जाती आढळतात. त्यातूनच जळगाव येथे पशुवैद्यकीय अधिकारी रवींद्र पाटील तसेच डॉक्टर बाळ रवी सूर्यवंशी व सहकाऱ्यांनी काही वर्षापूर्वी सातपुडा देशी या नावाने कोंबडीचे वाण विकसित केले. होते .
त्या वाणाला केंद्र शासनाची देखील मान्यता मिळाली होती .बीएससी ऍग्री एमबीए झालेल्या आदित्य पाटील यांनी त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनातून 2013 पासून कोंबडीचे व्यावसायिक पालन सुरू केले. रवींद्र पाटील तसेच डॉक्टर बाळ रवी सूर्यवंशी यांचे त्यांना सहकार्य लाभले.
व्यवसायिक कोंबडी पालन
आदित्य हे जळगाव मध्ये राहत असून तसेच चहार्डी त्यांचे मूळ गाव असून तिथे बारा हजार पक्षांचा पोल्ट्री फार्म आहे. यांच्या व्यवस्थापनासाठी सहा जण तिथे कार्यरत असतात. तेथील आठवडभराचा खर्च हा 40 हजार आहे. त्यांच्या पशुखाद्याचा पुरवठा जळगाव येथून केला जातो. खाद्यामध्ये पक्षांना आवश्यक अन्नघटक आहेत की नाही याची तपासणी देखील होते.
आदित्य यांनी या व्यवसायाला बारा लाख रुपये कर्ज घेतले होते 100% कर्जाची फेड पाच वर्षात केली. या फार्ममध्ये असलेले पक्षांची अत्यंत दक्षता घेतली जाते. तसेच त्यांना दर महिन्याला लसीकरण व किडीपासून बचावासाठी फवारणी देखील केली जाते.
उत्पादन आणि विक्री
सुरुवातीला त्यांनी मांसल पक्षांची विक्री केली .पुढे 2018 च्या दरम्यान अंडी उत्पादन सुरू केले. त्यात त्यांना चांगले यश आले. सातपुडा देशी पक्षाची वय 20 आठवडे झाल्यानंतर अंडी उत्पादन सुरू होते. ते पुढे 17 व्या 18 व्या आठवड्या पर्यंत चालते .एकूण कालावधीमध्ये पक्षी 180 अंडे देतात. त्यानंतर मासल पक्षी म्हणून विक्री केली जाते.
आदित्य यांच्या फार्ममध्ये दर महिन्याला 80 हजार अंड्याच्या आसपास उत्पादन घेतले जाते. अंड्याची विक्री गोवा सरकार ,राऊरकेला उत्तराखंड ,इत्यादी भागांमध्ये केली जाते. या अंड्याची किंमत 13 ते 16 रुपये एवढी असते.
सातपुडा देशी कोंबडीचे वैशिष्ट्ये
-गावरान कोंबडीशी मेळ घालणारा हा वाण आहे.
-शरीर रचना आकार डोक्यावरील तुरा व चव ही गावरान पक्षासारखीच आहे
भारतात गावरान पक्षी पासून विकसित केलेले संकरित पक्षाचे पाय हे रंगीत असतात. परंतु सातपुडा देशी पक्षाचे पाय हे गावरान कोंबडीच्या पक्षासारखे म्हणजेच पिवळसर रंगाचे असतात.
-पक्षाची वजन 60 दिवसांमध्ये एक किलो पर्यंत पोहोचते या कालावधीमध्ये त्यांना अडीच किलो एकूण खाद्य लागते.
-कोंबड्यांचे वजन सहा महिन्यात 4.5 किलो तर कोंबडीचे वजन हे 3.5 किलो एवढे होते.
-हा पक्षी काटक ब्लड फ्लू ,मानमोडी सारख्या आजारांना बळी न पडणार आहे. मरतुकीचे प्रमाण देखील कमी आहे.
-अंड्याची चवही गावरान कोंबडीच्या अंड्या सारखीच असते. आकार व रंगही तसाच असतो.