मागील चार दिवसा पूर्वी अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळाने हाहाकार माजवला होता. गुजरात मध्ये सध्या हळूहळू जनजीवन पूर्वीसारखे करण्यात येत आहे याच दरम्यान गुजरात सरकारकडून भीषण वादळामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यास सुरुवात झालेली आहे.
यासाठी विविध पथके या जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आलेले आहे तसेच गुजरातचे आरोग्य मंत्री आणि सरकारचे प्रवक्ते ऋषिकेश पटेल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर गांधीनगर मध्ये ही माहिती दिली.
या चक्रीवादळामुळे गुजरात मध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे फळबागांचे नुकसान झाले आहे ,गुरांचा मृत्यू झालेला आहे याबाबत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत गुजरात सरकारने निर्णय घेतलेला आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये राज्याच्या वीज आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला आहे. यामध्ये 783 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सरकारने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच 15 जून रोजी चक्रीवादळ आल्याने 6486 गावांमध्ये वीज खंडित झाली आहे. सरकारने आत्तापर्यंत 5753 गावांमध्ये वीज पुन्हा पूर्ववत केली आहे .उर्वरित गावांमध्ये विजेचा पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
या चक्रीवादळामुळे सुमारे 1320 गुरे तसेच 1900 पक्ष्यांचे नुकसान झालेले आहे. यामध्ये अंदाजे 1 कोटी 62 हजार रुपयांची भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. पटेल यांनी माहिती दिल्यानुसार कच्छ, देवभूमी ,द्वारका, मोरंबी ,पोरं बंदर, जामनगर ,या जिल्ह्यातील 53 हजार हेक्टर वरील सुमारे 14800 फळे देणारे झाडे पडली आहेत हे प्राथमिक मूल्यांकनातून समोर आले आहे . याचबरोबर एनडीआरएफ द्वारे एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांचा जीव वाचवण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.