पुणे पिंपरी चिंचवड मध्ये असलेल्या दस्त नोंदणी कार्यालयामध्ये अपुरी सुविधा ,जागेचा अभाव, तसेच सर्व्हर डाऊन यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे नागरिकांसाठी 15 जुलैपासून शहरातील 27 दुय्यम निर्बंधक कार्यालयात टोकन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. ही पद्धत प्रायोगिक तत्त्वावर असणार आहे. ती यशस्वी झाल्यास 15 ऑगस्ट पासून दोन्ही शहरांमध्ये कायमस्वरूपी हीच पद्धत राबविण्यात येणार आहे.
या कार्यालयामध्ये दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो .त्यामध्ये दुय्यम निर्बंधक कार्यालयात पाणी, स्वच्छतागृह ,शौचालय, जागा सर्व्हर डाऊन होणे किंवा संथगतीने चालणे इत्यादींचा प्रामुख्याने समावेश आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी मुद्रांक शुल्क विभागाने बैठक घेऊन उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.
याच दरम्यान शहरातील दुय्यमनिर्बंधक कार्यालयामध्ये सन 2015 पर्यंत दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना वकिलांचे टोकन दिले जात होते. मात्र ही पद्धत आता बंद पडली होती. खरेदी-विक्री व्यवहारांची संख्या सर्वाधिक वाढल्यामुळे सहाजिकच दस्त नोंदणीची संख्या देखील वाढली आहे. परिणामी सर्व्हरवर ताण येत असल्याने तो वारंवार डाऊन होत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत 15 जुलैपासून प्रायोगिक तत्त्वावर टोकन पद्धत ती सुरू करण्यात येणार आहे असे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले आहे
दस्त नोंदणी वेळेत
टोकन पद्धतीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे दिवसभरामध्ये प्रत्येक कार्यालयात नोंदविण्यात येणाऱ्या सुमारे 40 ते 50 दस्त पैकी काही टोकन वृद्ध आजारी व्यक्तींसाठी राखीव ठेवण्याचे सूचना देखील देण्यात आलेले आहेत ऑनलाईन पद्धतीने टोकन घेऊन त्यानंतरचा क्रमांक देण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांना अगदी सकाळपासूनच दस्त नोंदणीसाठी दुय्यमनिर्बंध कार्यालयामध्ये येण्याची गरज नाही
एकादस त्याला सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस मिनिटे लागतात त्यामुळे टोकन घेण्यापूर्वी पक्षकारांनी दस्ताची तपासणी मुद्रांक शुल्क तसेच डाटा एन्ट्री केल्याने नोंदणीला जास्त वेळ लागणार नाही असं दावाही नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाकडून करण्यात आला आहे