चालू खरीप हंगामात पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पोर्टलवर कार्यान्वित करण्यात आले आहे .शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै आहे. त्यापूर्वी अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आव्हान जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी डी एस गावसाने यांनी केले आहे. या वर्षापासून शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पिक विमा भरून विमा पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. हे या योजनेचे वैशिष्ट्ये आहेत.
कर्जदार व बिगर कर्जदार इच्छेनुसार या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने, अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी ,या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लागवड न झाल्यामुळे होणारे नुकसान ,खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित पिकांची सर्वसाधारण क्षेत्राच्या 75% पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी किंवा लागवड न झाल्यास विमा संरक्षण देय राहील. स्थानिक नैसर्गिक आपत्ती यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई देय राहील.
”जोखिमेचा संरक्षण लाभ ,मिळण्यासाठी घटना घडतात शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत विमा कंपनीला कृषी व महसूल विभागाला अगोदर सूचना देणे आवश्यक आहे. काढणीपश्चात नुकसान भरपाई बाबींमध्ये शेतात पिकांची कापणी करून सुकवणीसाठी पसरून ठेवलेली अधिसूचित पिके कापणी पासून दोन आठवड्या पर्यंत गारपीट वादळ अवकाळी पासून नुकसान झाल्यास भरपाई मिळते.
या पिकांना मिळणार संरक्षण
जिल्ह्यातील खरीप हंगामातील भुईमुगाला 29 हजार रुपये ,ज्वारी 25 हजार रुपये, सोयाबीन 45 हजार, रुपये उडीद 20हजार रुपये,मूग 20 हजार रुपये तूर 32 हजार रुपये, कापूस 23 हजार रुपये, बाजरी 22 हजार रुपये ,मका 6 हजार रुपये तर कांद्याला 65 हजार रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे विमा संरक्षण मिळेल.
शासन भरणार प्रीमियम
जिल्ह्यात खरीप हंगाम 2023 मध्ये खरीप बाजरी, ज्वारी, सोयाबीन ,भुईमूग ,कापूस तूर मका उडीद कांदा या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वसमावेशक पिक विमा योजनेअंतर्गत शेतकरी हिस्स्याचा भार शेतकऱ्यांवर न ठेवता विमा हप्ता रक्कम या वर्षापासून राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. यामुळे या वर्षापासून शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल.