रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ , शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका..

रासायनिक खतांच्या भावात आगामी खरीप हंगामापूर्वीच मोठी वाढ झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे , शेतमालाच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे.

रासायनिक खतांचा वापर शेतीसाठी जवळपास अनिवार्यच झाला आहे. म्हणून शेतीच्या उत्पादन खर्चामध्ये रासायनिक खताच्या किमती महत्त्वाची भूमिका बजावत असतात . त्याच मध्ये मागील काही वर्षांपासून रासायनिक खतामध्ये सततची वाढच होत आल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे .

जून महिन्यात जरी खरिपाची पेरणी शेतकरी करत असले तरी मे महिन्यापासूनच खताची खरेदी शेतकरी करत असतात . तसेच बेसल डोस देणे गरजेचे असल्यामुळे खताची आतापासूनच मागणी होत आहे. अशातच रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ झाल्यामुळे आर्थिक झळ शेतकऱ्यांना सोसावी लागणार आहे.

मिश्र खते, सुपर पोटॅशच्या भावातही मोठी वाढ झाली आहे , ट्रॅक्टरच्या आधारे होणाऱ्या आंतरमशागतीच्या खर्चातही डिझेलचे दर वाढल्याने मोठी वाढ झाली आहे.

प्रति एकर ५ हजार इतके सोयाबीन काढणीचे दरही झाले आहेत तर इतरही खर्चात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये मोठी वाढ झाली असून शेतकऱ्यांसाठी यंदाचा खरीप हंगाम मोठी आर्थिक कसरत करणारा ठरणार असुन या हंगामामध्ये शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे .

उत्पादन खर्च वाढत असताना मात्र शेतमालाच्या भावात घट होत असताना दिसत आहे . यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उत्पादन खर्चाचा सर्वात आवश्यक घटक असलेल्या खतांच्या भावातच वाढ होत असल्याने शेती आता आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. – प्रीतम भगत, शेतकरी, चांभई, ता. मंगरूळपीर

खतांचे पूर्वीचे दर

 

खतांचे सध्याचे दर

 

10.26.26

1470  रुपये 

10.26.26

1700 रुपये

24.24.0

1550 रुपये 

24.24.0

1700 रुपये

20.20.0.13

1250 रुपये 

20.20.0.13

1450 रुपये

सुपर फॉस्फेट 

500 रुपये

सुपर फॉस्फेट 

600 रुपये 

आपल्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खतांच्या वाढत्या किमतीचा परिणाम दिसून येतो. पोटॅश १०० टक्के, युरिया साधारणपणे १५ ते २० टक्के,सुपर फॉस्फेट ६० ते ७० टक्के बाहेरील देशातून आयात करण्यात येत असते . यामुळे खतांच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढल्याचा परिणाम देशात जाणवतो.
– सुनील पाटील, जिल्हाध्यक्ष, कृषी व्यावसायिक संघटना, वाशिम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *