सरकारने PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या नियमांमध्ये केला मोठा बदल ! योजनेबद्दलची नवी नियमावली जाणून घ्या सविस्तर …

पीएम किसान आणि नमो सन्मान या योजनेत केंद्र सरकारने काही बदल केले आहेत. आता या नवीन नियम बदलामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही नवीन नियम पाळावे लागणार आहेत. चला तर मग या योजनेत केंद्र सरकारने काय बदल केले आहेत ते जाणून घेऊयात.

काय आहेत नवीन नियम?

◼️ जमीन खरेदीचा कालावधी: २०१९ नंतर जमीन खरेदी केली असेल, त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार नाही याचा अर्थ, या योजनेचा लाभ २०१९ अगोदर जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे .

◼️ आधार कार्ड बंधनकारक : या योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.

◼️ वारसा हक्काची अट: कुटुंबातील कोणाचे जर निधन झाले असेल तसेच वारसा हक्काने जमीन मिळाली असेल, तर फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.

◼️ सरकारी नोकरी व कर: या योजनेचा सरकारी किंवा निमसरकारी नोकरी असलेल्या किंवा कर भरणाऱ्या व्यक्तींना लाभ मिळणार नाही.

का बदलले हे नियम?

योग्य लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचवणे हे या बदलामागे सरकारचे उद्दिष्ट आहे. पात्र नसलेल्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेत आहेत अनेकदा असे दिसून आले आहे , सरकारने त्यामुळेच ही नवीन नियमावली जारी केली आहे.

या योजनेचे महत्त्व काय आहे?

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी पीएम किसान आणि नमो सन्मान या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांच्या मदतीने शेतकरी आपल्या शेतीच्या कामांसाठी आवश्यक खर्च करू शकतात.

नवीन अर्जासाठी काय कागदपत्रे लागतील?

◼️लाभार्थी शेतकऱ्याच्या नावाचा नवीन सातबारा लागेल .

◼️अर्ज केलेल्या शेतकऱ्याच्या फेरफारमध्ये मयत व्यक्तीचा मृत्यू 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा असेल, तर एकच फेरफार.

◼️जर मृत्यू फेब्रुवारी 2019 नंतर झाला असेल, तर पूर्वीचा व नंतरचा असे दोन्ही फेरफार लागतील.

◼️पती, पत्नी व मुलांचे आधार कार्ड आवश्यक.

◼️12 अंकी रेशन कार्ड नंबर .

Leave a Reply