नांदेडच्या तरुण शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग,10 गुंठे शेतीत स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला.. 6 लाखांच्या उत्पन्नाची हमी…

अनेकदा शेती म्हटलं की शेतीमध्ये उत्पन्न नाही, शेतीत जास्त गुंतवणूक करावी लागते, गुंतवणुकीच्या तुलनेत परतावा देखील कमी मिळतो, अशी ओरड आपण नेहमीच ऐकतो.  परंतु आज आपण एका शेतकऱ्याची सक्सेस स्टोरी पाहणार आहोत.. ज्यामुळे तुम्हाला देखील प्रेरणा मिळेल आणि तुमचीही पावलं शेती व्यावसायाकडे वळतील… ही यशोगाथा आहे एक उच्च शिक्षित तरुण शेतकऱ्याची. 

नांदेड मधील बारड गावचा  बालाजी उपवार यांनी उच्च शिक्षण घेतले . बीए झाल्यानंतर शेतीची वाट धरली . अवघ्या दहा गुंठ्यातच स्टोबेरी ची लागवड केली आणि आज त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळू लागलेले आहे.

▪️ आधुनिक शेती करण्याकडे भर… 

आपण बघतोय की जसा काळ बदलतोय तसा शेतीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे . शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर पारंपारिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे वळलेले आहेत.  शेतीमध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग केले जातात त्यामध्येच नांदेडचा बारड येथील एका सुशिक्षित शेतकऱ्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्ट्रॉबेरी चा नवीन प्रयोग केला.  दहा गुंठ्यामध्ये त्यांनी हा प्रयोग केला आहे.

▪️ सेंद्रिय पद्धतीचा वापर.. 

बालाजी उपवार हे एक अल्पभूधारक प्रयोगशील शेतकरी आहेत.  त्यांचे शिक्षण बीए ग्रॅज्युएशन झाले आहे. ते आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग सतत करत असतात.  या वर्षी तर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहा गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली आहे.  ही स्ट्रॉबेरी पिकाची रोपे महाबळेश्वर वरून त्यांनी आणले आहेत.  नाभिला या जातीची ही स्ट्रॉबेरी रोपे असून चार हजार कलमे त्यांनी आणली होती.  लागवड करताना त्यांनी संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा वापर केला आहे.  तसेच त्यांनी ठिबक आणि मल्चिंग पेपरचा देखील वापर करून पिकांची लागवड केली आहे.

▪️ विक्री कशी केली जाते..

दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीनंतर स्ट्रॉबेरी काढण्यास येते . बालाजी उपवार हे स्ट्रॉबेरी थेट बाजारात न विकता शेतकरी ते ग्राहक या तत्त्वाचा अवलंब करतात व थेट आपल्या शेतापुढेच स्टॉल लावून आणि नांदेड शहरात अनेक भागात सोसायटीमध्ये जाऊन स्ट्रॉबेरीची विक्री करत आहेत.  त्यामुळे थेट शेतकरी ते ग्राहक स्ट्रॉबेरीची विक्री केली जात आहे.

▪️ यामधून त्यांना किती उत्पन्न मिळते..

स्टोबेरी ही प्रति किलो 300 रुपयांनी विकली जाते . थेट शेतकऱ्याकडून ताजा माल विकत मिळत असल्यामुळे ग्राहक देखील ते आवडीने घेतात . त्यामुळे त्यांची विक्री भरपूर प्रमाणात होते.  तसेच त्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी दीड लाख इतका खर्च झाला ते 30 किलो स्ट्रॉबेरीची रोज विक्री करतात व पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न मिळवतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *