आजकाल सगळ्याकडे अॅण्डॉईड स्मार्टफोन आहेत या मोबाईल मध्ये अशा काही सेटिंग्स आहेत त्या ऑन राहिल्यामुळे फोनची बॅटरी लवकर उतरते. तसेच या सेटिंग्स ऑन राहिल्यामुळे तुमच्या मोबाईलमधील डेटा चोरीला जाऊ शकतो. यामुळे तुमच्या फोनमधील डेटा चोरीला जावू नये म्हणून ‘या’ सेटिंग्स ऑन असतील,तर लगेच ऑफ करा.
आय फोन पेक्षा अॅण्डॉईड फोन मध्ये प्रवेश करणे अधिक सोपे असते . कारण अॅण्डॉईड मोबाईल हे ओपन नेटवर्क आहे. तुम्ही सावध न राहिल्यास सायबर गुन्हेगार तुमच्या फोनमधील माहिती ते जाणून घेऊ शकतात.
1. आवश्यकता असेल तरच लोकेशन्सचा अॅक्सेस द्या
जेव्हा तुम्ही मोबाईल वापरता तेव्हा लोकेशन अॅक्सेस देण्यासाठी, अॅण्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी, तसेच अॅण्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी बऱ्याच सेटिंग्सला परवानगी देता परंतु आता मात्र हे सर्व अॅक्सेस तेव्हाच द्या
जेव्हा त्याची तुम्हा गरज असेल .
तुम्ही जेव्हा सर्व अॅप्सला लोकेशन अॅक्सेस देता तेव्हा तुमची लोकेशन हिस्ट्री सर्वांना दिसून येते. त्यामुळे तुमची लोकेशन हिस्ट्री कोणालाही माहिती करून घेता येऊ शकते. म्हणून आवश्यक असेल त्यालाच लोकेशन्सचा अॅक्सेस द्या. आपल्याकडून या सेटिंग्स ऑन असल्यामुळे मोबाईलची बॅटरीही खूप लवकर संपते.
2. WiFi आणि Bluetooth ऑप्शन
आपल्या सगळ्यांकडून Bluetooth आणि WiFi दोन्ही ऑप्शन्स अनेक वेळा गरज नसताना ऑन असतात. त्यामुळे सर्वात अगोदर गरज नसल्यास हे ऑपशन बंद करा.जर हे दोन्ही ऑप्शन्स ऑन राहिल्यामुळे तुमचा मोबाईल इतर कोणत्याही डिव्हाईसला कनेक्ट होऊ शकतो त्यामुळे तुमचा डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे गरज असेल तेव्हाच Bluetooth व WiFi ऑन करा.
3. नोटिफिकेशन हाइड करा
आज आपण सर्वच कामे मोबाईलद्वारे करत असतो. त्यामुळे त्या कामाची माहिती त्यामध्ये सेव्ह असते.आपण जगभरातील माहिती शोधण्यासाठी आपल्या फोनचा खूप वापर करतो. ओटीपी, नवीन मेसेज, पासवर्डही मोबाईलवरच मिळवला जातो. तुम्ही नोटीफिकेशनचा ऑप्शन चालू ठेवल्यास, तुमच्या नकळत कोणीतरी तुमची माहिती मिळवू शकते.. त्यामुळे हे ऑप्शन Hide करून ठेवा.
4. मोबाईल Location हिस्ट्रीला बंद करा
तुमच्या मोबाईलच्या लोकेशन हिस्ट्रीचा ऑप्शन ऑन असेल तर गुगलची पाळत वाढते. त्यामुळे कंपनीकडून मोबाईलवर विविध प्रकारच्या हॉटेल्स, शॉपिंग मॉल, जाहिराती, क्लब यांची माहिती दिली जाते. ही सर्व माहिती तुमच्या लोकेशनुसार मोबाईल फ्लॅश होत असते. त्यामुळे नेहमी लोकेशन हिस्ट्री बंद करून ठेवा . हे करण्यासाठी, तुमच्या फोनवरील सेटिंग्जमध्ये जा आणि Google खाते पर्याय शोधा. त्यानंतर ‘डेटा अॅण्ड प्रायव्हसी’ नावाच्या विभागात जा आणि लोकेशन हिस्ट्री चालू असल्यास ती बंद करा.