पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे का , या पाच पद्धतीने नोंदवता येईल तक्रार,जाणून घ्या सविस्तर..

शेतकऱ्याला शासकीय मदत व पिक विमा मदत घ्यावयाची असेल तर नुकसानीचा दावा पिकांचे नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आतमध्ये तो ही ऑनलाइन करायचा आहे. परंतु पाऊस पडून किंवा पिकाचे नुकसान होऊन ७२ तास होऊन गेले आहे तरी शेतामध्ये पाणी साचलेले आहे किवा नुकसानीपर्यंत जाणे कठीण आहे तर शासनाकडून पीक पंचनामा केल्या शिवाय मदत मिळत नाही . 

तसेच पावसामुळे तांत्रिक अडचणीही वेगळ्याच निर्माण झालेल्या असतात. साचलेल्या पाण्यामुळे शेतामध्येच जाता येत नाही, त्यामुळे नुकसानीचा दावा करायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.

या पाच पद्धतीने नोंदवता येणार तक्रार..

🔰 झालेल्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांना क्रॉप इन्शुरन्स अॅप यामाध्यमातून स्वतः भरायची आहे, त्या द्वारे माहिती भरल्यानंतर अधिकारी कर्मचारी हे पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर येतात.

🔰 ज्या विमा कंपन्या आपापल्या भागात काम करत आहेत त्यांच्या टोल फ्री नंबर द्वारेही शेतकरी झालेल्या नुकसानीची माहिती सांगू शकतात.

🔰 शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये हे ऑफलाइनही तक्रार करू शकतात. आवश्यक ती माहिती कंपनीकडून देण्यात आलेल्या फॉर्मवर भरावी लागणार आहे.

🔰 ज्या बँकेमध्ये शेतकऱ्यांनी आपला विमा भरलेला आहे त्या बँकेच्या शाखेतही शेतकरी तक्रारीचा अर्ज करू शकतात .

🔰 विमा कंपनीला ऑनलाइन किंवा ऑफलाइन माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान झाल्याचे कळवावेच लागणार आहे.

Leave a Reply