
nccf kanda kharedi: राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे एनसीसीएफ अर्थात नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या संस्थेने आता थेट शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कांदा खरेदीला सुरुवात केली आहे.
याआधी नाफेडकडून १२ सहकारी संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू झाली होती. आता ७ जुलैपासून एनसीसीएफची खरेदी २७ एफपीओंच्या (शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या) माध्यमातून सुरू झाली आहे. त्यासंदर्भात स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या खरेदीमुळे सध्या पडलेल्या कांद्याच्या दरात शेतकऱ्यांना काही प्रमाणात आधार मिळेल अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी यासाठी संबंधित शेतकरी उत्पादक संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
खरेदी करणाऱ्या २७ शेतकरी उत्पादक संस्थांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
1. पुनदसागर एफपीओ – अंभोणे, नांदगाव, नाशिक – 9623829100
2. श्री व्यंकटेश्वर एफपीओ – माळवाडी, निफाड, नाशिक – 9834365184
3. साई क्रांती एफपीओ – शिंगवे, सटाणा, नाशिक – 7769954344
4. साई कृषी उत्पादक कंपनी – एम. फुलपाडे, येवला, नाशिक – 9405594482
5. शिवराज्य एफपीओ – शिवरे, निफाड, नाशिक – 9406426004
6. माता सती महिला कृषी एफपीओ – सादवड, मालेगाव, नाशिक – 9370608189
7. संकल्प एफपीओ – जुनगाव रोड, त्र्यंबक, नाशिक – 8275407519
8. वैभव लक्ष्मी एफपीओ – पिंपळगाव बसवंत, नाशिक – 9764978378
9. स्वराज्य महिला एफपीओ – पिंपळगाव बसवंत, नाशिक – 9518354683
10. शिवनेरी एफपीओ – निफाड, नाशिक – 9687945535
11. ज्ञानेश्वरी एफपीओ – अभोणे, नाशिक – 9370151685
12. फाईव्ह स्टार ग्रीन एफपीओ – देवळा, नाशिक – 8329789270
13. सातमाने एफपीओ – धामणगाव, हिंगोणी, नाशिक – 9553451008
14. वल्लभ अॅग्रो एफपीओ – धारी, मालेगाव, नाशिक – 9404493338
15. वेस्ट साऊथ सावालोबी एफपीओ – पारनेर, अहमदनगर – 9850083104
16. संत गोरोबा एफपीओ – वैजापूर, औरंगाबाद – 9011480580
17. गोकर्ण फ्रेस एफपीओ – बल्लाळवाडी, जुन्नर, पुणे – 9859969689
18. फार्मटेक एफपीओ – पिंपळगाव बसवंत, नाशिक – 9657204013
19. सोमेश्वर महिला एफपीओ – उमराणे, नाशिक – 9623178750
20. शिवशक्ति महिला एफपीओ – उमराणे, नाशिक – 9822315865
21. गिरीशपुर एफपीओ – मालेगाव, नाशिक – 8668297315
22. आदर्श महिला प्रोड्यूसर एफपीओ – सुभाननगर, मालेगाव, नाशिक – 7020533940
23. सबरंग कृषी एफपीओ – सटाणा, नाशिक – 9921546580
24. रंज एफपीओ – नाशिक – 8208182871
25. कृषी कल्याण एफपीओ – सटाणा, नाशिक – 7028790677
शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आपल्या गावाजवळील संबंधित एफपीओशी संपर्क साधावा. संबंधित एफपीओ खरेदी केंद्रावर आपली नोंदणी केल्यानंतरच कांदा विक्रीस पात्रता मिळते.
नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळ:
http://epravasan.com/nccf किंवा http://www.nccf.com
अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी एनसीसीएफ कार्यालयाचा पत्ता –
2089 ते 2090, सेवी प्लाझा, जुना आग्रा रोड, कालिका मंदिरसमोर, नाशिक – 422002
शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या किमतीसाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.