Todays tomatos rate : टोमॅटो उत्पादकांसाठी मोठी बातमी; देशातील टोमॅटो लागवडीत घट, भाव वाढणार?

Todays tomatos rate

Todays tomatos rate : देशभरात रब्बी हंगामातील लागवडीचा आढावा घेतला असता १ एप्रिल २०२५ पर्यंत देशात विविध रब्बी पिकांची एकूण ६६०.६५ लाख हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. मात्र, टोमॅटोच्या बाबतीत यंदा लागवडीचे क्षेत्र घटले असून ती चिंतेची बाब ठरू शकते, मात्र लागवडीत घट झाल्याने टोमॅटोची आवक आगामी काळात कमी होण्याची शक्यता असून भविष्यात टोमॅटोच्या बाजारात वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

टोमॅटोचे यंदा देशात २.९४ लाख हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत ३.१२ लाख हेक्टर होती. म्हणजेच सुमारे ०.१८ लाख हेक्टरनी लागवड कमी झाली आहे. पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा देखील ही आकडेवारी कमी आहे, कारण रब्बी टोमॅटोची सामान्य लागवड ५.८० लाख हेक्टरपर्यंत असते. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणा हे प्रमुख उत्पादक राज्य असून यंदा या राज्यांतील भागांमध्ये हवामानाचा मोठा प्रभाव जाणवतो आहे.

हवामानाचा विचार करता, मार्च महिन्याच्या अखेरीस देशात ३४% नी कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. पूर्व आणि ईशान्य भारतात -४२%, मध्य भारतात -४०% आणि उत्तर-पश्चिम भारतात -४२% एवढी तूट आहे. यामुळे टोमॅटो रोपांची सुरुवातीची वाढ आणि फळधारणेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

सध्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा आणि ओडिशा या भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि वीजांचे वातावरण दिसून येत आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार या हवामान बदलांचा परिणाम टोमॅटोचे उत्पादन, फळांची गुणवत्ता व बाजारात पोहोचण्यावर होऊ शकतो. हवामान सतत बदलत असल्याने टोमॅटो पिकावर बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो आणि फळांची टिकवणूक कमी होते.

त्याशिवाय मागील आठवड्यात टोमॅटोच्या घाऊक आणि किरकोळ बाजारभावातही घसरण झाली आहे. घाऊक बाजारात दर ७४८ रुपये क्विंटलवर आले असून, किरकोळ बाजारात २०७८ रुपये क्विंटल दर आहे. मागील वर्षी याच कालावधीत हे दर अनुक्रमे १५५६ आणि ३२३८ रुपये होते. त्यामुळे कमी लागवड, प्रतिकूल हवामान आणि बाजारभावात घसरण यामुळे टोमॅटो उत्पादकांसमोर सध्या अडचणी असल्या तरी आगामी काळात लागवड घटल्याने आणि उत्पादन कमी होणार असल्याने बाजारभाव वाढीचे संकेत आहेत.