कोट्यवधी रुपयांचा अनुदानित युरियातील काळाबाजार उघडकीस,वाचा सविस्तर ..

शेतकऱ्यांसाठी पाठवण्यात आलेला अनुदानित युरिया काळ्याबाजारात विकला जात असल्याचा संशय खरा ठरला आहे.कृषी विभागाने कोट्यवधी रुपयांचा युरिया काळ्याबाजारात विकणारे रॅकेट पकडले आहे.

या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत.असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे . अर्थात, कृषी विभागाने या रॅकेटचा पर्दाफाश केलेला नाही. तर एक लेखी तक्रार प्रकाश पाटील नावाच्या व्यक्तीने पुराव्यांसह कृषी आयुक्तांकडे केली होती. ५० कोटींच्या आसपास यातील गैरव्यवहाराची रक्कम असल्याचा दावा तक्रारदार श्री. पाटील यांचा होता. युरियाचे रॅकेट चालू असल्याची ही तक्रार दाबून ठेवण्यात आली होती.

त्यामुळे चौकशीसाठी तक्रारदाराने परत दुसरा अर्ज केला. याची गंभीर दखल गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांनी घेतली व चौकशीचे आदेश दिले . कृषी आयुक्तालयाने पुण्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना एक आदेश दिला आहे. यामध्ये इंदापूर भागामधील एक व्यक्ती औद्योगिक वापरासाठी अनुदानित खते थेट बेकायदेशीरपणे विकत असल्याचा उल्लेख आहे.

‘‘आलेली तक्रार आयुक्तालयाकडे दाबून ठेवली नव्हती. तर याउलट आम्ही स्वतंत्र पथक स्थापन केले. पुण्याचे विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी यांना चौकशी पथकाने आपला अहवाल दिला होता. या प्रकरणाचे धागेदोरे श्री. नाईकवाडी यांनीही तपासले व पथकाचा अहवाल योग्य असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर पुढील कारवाईचे लगेच आदेश देण्यात आले ,’’ असा दावा ‘गुणनियंत्रण’च्या अधिकाऱ्याने केला.

‘केंद्रीय खत नियंत्रण आदेश १९८५’मधील तरतुदींचे युरिया गैरव्यवहार प्रकरणामध्ये उघडपणे उल्लंघन झाल्याचे आयुक्तालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असलेल्या खत दुकानदाराचा परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . तसेच यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा . खत उद्योगातील सर्व कंपन्यांना या खत विक्रेत्याचा युरिया पुरवठा रोखण्याच्या सूचना द्या, असे आदेश आयुक्तालयाने दिले आहेत.

…असे चालविले खत विक्रीचे रॅकेट

खत विक्रीची पक्की बिले शेतकऱ्यांना दिली जात नाहीत

शेतकऱ्यांच्या खते विकताना बिलावर सह्या घेतल्या जात नाहीत

खत दुकानामधील विक्री पावती पुस्तक व शेतकऱ्यांना विकलेले खत यात फरक .

शेतकऱ्यांना खत विकले असे दाखवून प्रत्यक्षात काळ्याबाजारात विक्री करतात .

Leave a Reply