निर्यातक्षम फळे-भाजीपाला पिकांची हॉर्टीनेट प्रणालीवर शेत नोंदणी करण्याचे आवाहन :डॉ. कैलास मोते.

महाराष्ट्र राज्य फलोत्पादन पिकाचे क्षेत्र उत्पादन व निर्यातीमध्ये अग्रेसर असून राज्यातून मोठ्या प्रमाणात विशेषता द्राक्ष ,केळी, आंबा ,डाळिंब ,संत्रा व इतर पिकांची तसेच कांदा, हिरवी मिरची, भेंडी व इतर भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणावर निर्यात युरोपियन युनियन, सार्क देश व इतर देशांना केली जाते.

तर  यंदाच्या हंगामात जास्तीत जास्त माल  निर्यात व्हावा यासाठी कृषी विभागाकडून फळे भाजीपाला पिकांची हॉर्टीनेट प्रणालीवर शेत नोंदणी करण्याचे अहवाल करण्यात आले आहे . राज्यातून फळे व भाजीपाला पिकांच्‍या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी व आयतदार देशांच्या कीटकनाशक उर्वरित किड रोग मुक्‍तची  हमी देण्यासाठी सन २००४ ते ५ पासून ग्रेपनेट या ऑनलाइन  कार्यप्रणालीची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सन 2022 23 मध्ये द्राक्षाची ग्रेपनेट  प्रणालीवर 46 हजार 97 ,आंब्यासाठी मँगोनेट  प्रणालीवर ९ हजार ९९१, भाजीपाल्‍यासाठी व्हेजनेट प्रणालीवर ८ हजार २५ प्लॉटची नोंदणी केलेली झाली होती. राज्यात हॉर्टीनेट प्रणालीवर एकूण ७३ हजार ५६५ शेतकऱ्याची शेत नोंदणी झाली होती,  ती देशाच्या तुलनेने 92 टक्के  असून आपले महाराष्ट्र राज्य निर्यातक्षम  शेत नोंदणीत प्रथम स्थानी आहे.

दरम्यान सन 2023 24 मध्ये द्राक्ष व आंबा पिकाची शेत नोंदणी सुरू झाली असून इतर पिकाची नोंदणी वर्षभर सुरू असते. सन  2023 24 मध्‍ये निर्यातक्षम फळे व  भाजीपाला पिकांची ट्रेसेबिलिटी नेटव्‍दारे नोंदणी करण्‍याकरीता १.२५ लाख लक्षांक सर्व संबधित जिल्ह्यांना वितरीत आलेले आहे.

गतवर्षीच्या  तुलनेत सध्या  स्थितीत  नोंदणी अत्यंत अल्प झाली असून जास्तीत जास्त शेत नोंदणी करण्यासाठी व निर्धारित लक्षांक वेळेत पूर्ण करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांनी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी निरक्षण पिकांची शेत नोंदणी संबंधित प्रणालीवर करावी असे आव्हान फल उत्पादन संचालक डॉक्टर कैलास मोहिते यांनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *