Israel-Iran tensions : इस्त्रायल-इराण तणावाचा खतांच्या किंमतीवर होणार परिणाम?

Israel-Iran tensions : इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावाने पुन्हा एकदा खाडी मार्गाची असुरक्षितता वाढवली आहे. २२ जून रोजी इराणच्या संसदेनं ‘हॉर्मुज सामुद्रधुनी’ बंद करण्याची शिफारस केल्यानंतर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. ही सामुद्रधुनी म्हणजे जगाच्या एकूण २० टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाच्या वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम भारतावर, विशेषतः शेती […]
Online land records:ऑनलाइन जमीन नोंदी: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!…

Online land records: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि नवीन डिजिटल सुविधा १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होत आहे. महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांना सातबारा, ८अ उतारे आणि इतर जमीन कागदपत्रे व्हॉट्सअॅपवर फक्त १५ रुपये शुल्कात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. महाकरार: डिजिटल सुविधाशेतकऱ्यांना आता महाभूमी पोर्टलवर मोबाईल नोंदणी करून ही डिजिटल सेवा मिळवता येईल. यामुळे […]
DAP fertilizer : नाशिकमध्ये डीएपी खताचं संकट आणि पर्याय..

DAP fertilizer : नाशिक जिल्ह्यात खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू आहे. या काळात शेतकऱ्यांकडून डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) खताची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मात्र, डीएपी खताची उपलब्धता कमी झाल्याने काही ठिकाणी त्याचे दर वाढले आहेत. याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत असून, कृषी विभागाने यावर लक्ष देण्याची गरज आहे. डीएपी खताची कमतरता का? डीएपी खताच्या कमतरतेचे मुख्य कारण […]
Tur bajarbhav : तूर बाजार भाव: तुरीच्या आवकेत वाढ, दर स्थिर..

Tur bajarbhav : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात स्थिरता दिसून येत आहे, तर आवकेत मोठी वाढ झाली आहे. आज, २० जून रोजी, राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या आवकेत मोठी वाढ झाली असून, एकूण १५,७४५ क्विंटल तूर बाजारात दाखल झाली आहे. तुरीच्या दरात स्थिरता असून, सर्वसाधारण दर ६,२६० रुपये प्रति क्विंटल इतका मिळत आहे. विविध बाजार […]
NAFED-NCCF onion scam : नाफेड-एनसीसीएफ कांदा घोटाळ्यावर कोर्टाची गंभीर दखल, तातडीने सुनावणी सुरू..

NAFED-NCCF onion scam : महाराष्ट्रातील कांदा साठवणूक आणि विक्री प्रक्रियेत नाफेड व एनसीसीएफसह अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या नावाने झालेल्या ५,००० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी सुरू केली आहे. पिंपळगाव बसवंत येथील शेतकरी विश्वास माधवराव मोरे यांनी दाखल केलेल्या फौजदारी रिट याचिकेवर १७ जून रोजी न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी १५ जुलै २०२५ […]
Kanda bajar bhav : राज्यात कांद्याच्या सरासरी दरात थोडीशी वाढ; या बाजारात सर्वाधिक दर…

kanda bahar bahv : राज्यात १९ जून २०२५ रोजी कांद्याचा सरासरी घाऊक दर १३५० रुपये प्रतिक्विंटल इतका नोंदवला गेला. मागील दिवशी, म्हणजेच १८ जून रोजी हा सरासरी दर १३२५ रुपये इतका होता. त्यामुळे एका दिवसात सरासरी दरात २५ रुपयांची वाढ झाली आहे. सध्या राज्यात विविध बाजारांमध्ये दरात काही प्रमाणात चढ-उतार दिसून येत आहेत. १९ जून […]
Milk Adulteration Act : दूधाची भेसळ रोखण्यासाठी महाराष्ट्रात नवा कायदा येणार…

Milk Adulteration Act : राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली. मंत्री सावे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच दुग्धविकास विभागाच्या १५० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक झाली. यावेळी दुग्धविकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., महानंदचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर यांच्यासह राज्यातील प्रमुख दूध संघांचे प्रतिनिधी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) […]
Drought-affected projects : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांसाठी १७४ कोटींचा विशेष प्रकल्प राबविणार..

Drought-affected projects : महाराष्ट्रातील सातारा, नाशिक, धुळे, अकोला आणि लातूर या पाच जिल्ह्यांतील निवडक दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये आता राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (NDMF) अंतर्गत विशेष दुष्काळ निवारण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाने १९ जून २०२५ रोजी याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून १७४.१० कोटी रुपयांची […]
Dam water storage : गंगापूर, उजनी, दारणा धरण ६० टक्के भरले; असा आहे राज्यातील पाणीसाठा…

Dam water storage : मागील दोन दिवसांपासून मध्य महाराष्ट्रा आणि कोकणात सुरू असलेल्या पावसामुळे काही धरणांमध्ये जूनमध्येच ५० टक्केहून अधिक पाणीसाठा झाला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमध्ये २० जून २०२५ रोजी सकाळपर्यंत एकूण पाणीसाठा ३५.५८ टक्के इतका नोंदवला गेला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला हा साठा १९.८५ टक्के होता. त्यामुळे सध्या राज्यात मागील वर्षीपेक्षा चांगल्या प्रमाणात […]
Model Solar Village : या योजनेमुळे अख्ख्या गावाच्या लाईट बिलाची झंझट संपणार; शेतकऱ्यांनाही फायदा…

‘Model Solar Village’ : सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती आपला भारत देश पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि राज्यातील गावे-घरे मोफत सोलर वीजेने ऊर्जावान करण्याचा संकल्प केंद्र व राज्य शासनाने केला आहे. अनेक नागरिक आपल्या निवासस्थानी सोलर यंत्रणा स्थापित करून वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याची […]