शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यास पीक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळते . यामुळे शेतकऱ्यांना थोडासा का होईना दिलासा मिळतो .याच धरतीवर राज्यात आता पशुधनासाठी ही विमा योजना राबवण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
विमा कंपन्यांशी याबाबत राज्य सरकारचे बोलणे झाले आहे. या योजनेची पूर्तता झाली तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मागच्या दोन वर्षापासून देशासह राज्यभरात लम्पी रोगामुळे जनावरे मरण पावले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे काम चालू आहे. जनावरांना या रोगाची पुन्हा लागण होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात सरकाने लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विम्याद्वारे पशुपालकांना संरक्षण देता येईल का ? असा विचार राज्य सरकार करत आहे.
यापूर्वीही पशुधन विमा योजना राबवली जात होती मात्र या योजनेसाठी काही मर्यादा असल्याचे पशुपालकांचे म्हणणे आहे त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांसाठी एक रुपयात कृषी पीक विमा योजना लागू केली आहे. त्याच धर्तीवर सरकार पशुधनासाठीही विमा योजना सुरू करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे.
महाराष्ट्र मध्ये 2019 साली पशु गणना करण्यात आली त्यामध्ये तीन कोटी तीस लाख 80 हजार पशुधन असल्याची माहिती समोर आली. 1997 साली पशुधनाची संख्या 4कोटी होती .मागच्या वीस वर्षात ही संख्या घटल्याचे दिसून येत आहे.
सध्या पशुधनात विमा योजनेत भारतात महाराष्ट्राचा सातवा क्रमांक लागतो. यामध्ये गाई, बैल ,स्ववर्गातील पशुधन दिले जाते .यामध्ये एक कोटी 39 लाख 93 हजार पशुधन विमा देण्यात आला आहे .तर म्हैस, रेडा ,स्ववर्गातील पशुधन 56 लाख 4 हजार रुपये देण्यात आला. मेंढी स्ववर्गातील एक कोटी ३२ लाख ८५००० पशुधन देण्यात आले याचबरोबर इतर स्वर्गातील पशुधन एक लाख 98 हजार देण्यात आला .